विद्या बाहेर येईपर्यंत तो तिथेच ताटकळत राहिला. अखेर काही तासांनंतर विद्या बाहेर आली. मग काय, विद्या येताना दिसताच हा चाहता तिला एक सेल्फीसाठी विनवणी करू लागला. कदाचित विद्या घाईत होती. त्यामुळे तिने त्या चाहत्याकडे दुर्लक्ष केले. पण चाहता चांगलाच पक्का होता. तो विद्याचा पिच्छा सोडायला तयार होईना.
ALSO READ : ‘तुम्हारी सुलू’मध्ये विद्या बालनबरोबर झळकणार रणबीर कपूर!!
शेवटी काय तर विद्या वैतागली. इतकी की, तिला अखेर थांबणे भाग पडले. शेवटी ती क्षणभर थांबली आणि त्या चाहत्यासोबत सेल्फीसाठी उभी झाली.
मग काय, त्या चाहत्याची कळी इतकी खुलली की, विचारू नका. साक्षात विद्या आपल्यासोबत सेल्फीसाठी उभी म्हटल्यावर तो अगदी ‘सातवे आसमाँ’वर होता. या क्षणाचे काही फोटो आमच्या हाती लागले आहेत. ते फोटो तुम्ही पाहायलाच हवेत. पाहा तर मग!!
सध्या विद्या बालन ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात विद्या पुन्हा एकदा आरजेच्या भूमिकेत दिसणार आहे.