यावेळी उदय ग्रे कलरचा स्वेटशर्ट आणि ब्ल्यू जीन्समध्ये दिसला. विमानतळावर फोटोग्राफर्सचे कॅमेरे उदयचे फोटो घेण्यासाठी सरसावले, तेव्हा उदयने अगदी हसून त्यांना प्रतिसाद दिला. पण नर्गिसचे म्हणाल तर, ती मीडियापासून चेहरा लपवताना दिसली. प्रिंटेट टी-शर्ट, ब्ल्यू जॉगर्स आणि जॅकेट अशा अवतारात नर्गिस विमानतळावर पोहोचली. पण पूर्णवेळ पिंक कलरच्या स्टोलने चेहरा लपवताना ती दिसली.
ALSO READ : नर्गिसची ही पोस्ट कुणासाठी??
आता नर्गिसच्या चेहरा लपवण्यामागचे कारण तर आम्हाला कळलेले नाही. कदाचित तिच्याबद्दल आणि उदयबद्दल लोकांनी लिहू नये, अशी नर्गिसची इच्छा असेल. पण चेहरा लपवून ही इच्छा कशी पूर्ण होणार? उलट उदय चोप्रा इतका बिनधास्त असताना नर्गिसने असा चेहरा लपवणे, याचीच मोठी हेडलाईन झाली. असो, काही तरी शिजले तर आपल्याला वास येईलच!