दरम्यान लक्ष्यच्या बर्थ-डेसाठी त्याचा एक खास चिमुकला मित्र उपस्थित होता. होय, या बर्थ-डेसाठी अभिनेत्री करिना कपूर आपल्या लाडक्या तैमुरसोबत पार्टीत सहभागी झाली होती. त्यामुळे लक्ष्यला चांगलीच कंपनी मिळाली होती. शिवाय या दोघांमध्ये चांगली गट्टीही जमली होती.
लक्ष्यच्या वाढदिवसाचे काही फोटोज् समोर आले असून, त्यामध्ये लक्ष्य खूपच क्यूट दिसत आहे. पप्पा तुषारच्या कडेवर असलेला लक्ष्य पहिला वाढदिवस चांगलाच एन्जॉय करताना बघावयास मिळत आहे. यावेळी लक्ष्यने ब्लॅक जीन्स आणि ब्लू डेनिम शर्ट घातला होता. त्यामध्ये तो खूपच गोड दिसत होता. लक्ष्य पप्पा तुषारबरोबरच आजोबा जितेंद्रचाही खूप लाडका आहे. सोशल मीडियावरील बरेचशा फोटोंमध्ये तो आजोबासोबत बघावयास मिळतो.
जेव्हा लक्ष्यचा सरोगसी पद्धतीने जन्म झाला होता, तेव्हा त्याच्या जन्माच्या २७ दिवसांनंतर त्याचा पहिला फोटो तुषारने शेअर केला होता. वास्तविक सरोगसी पद्धतीने वडील बनण्याच्या तुषारच्या निर्णयाला वडील जितेंद्र यांनी पाठिंबा दिला होता. सध्या तुषार त्याच्या आगामी ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, आपल्या मुलाला तो दररोज सेटवर घेऊन जात असतो.
जेव्हा या चित्रपटाची शूटिंग कोलकाता येथे होणार होती, तेव्हा तुषारने फॅमिलीसह कोलकाता गाठले होते. कारण लक्ष्य सकाळीच उठत असून, त्याला पप्पा तुषारसोबत राहायला आवडते. तुषार सकाळी त्याच्याजवळ नसल्यास तो खूपच कासावीस होत असल्यानेच तुषारने त्याला कोलकाता येथे नेले होते.