जान्हवी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार जान्हवी दिग्दर्शक आणि निर्माता करण जौहर याच्या चित्रपटातून डेब्यू करण्याची शक्यता आहे. त्याचा हा चित्रपट सुपरहिट मराठी चित्रपट ‘सैराट’चा रिमेक असेल. या चित्रपटात जान्हवीच्या अपोझिट शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर बघावयास मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी या दोघांना एकत्र मुव्ही डेटला जाताना बघण्यात आले होते.
तसेच काही दिवसांपूर्वीच जान्हवी करणच्या पार्टीतही सहभागी झाली होती. या पार्टीत करणचे जवळचे मित्र सहभागी झाले होते. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार जान्हवीने पार्टीत रणबीर कपूरसोबत क्वालिटी टाइम व्यतीत केला होता. जान्हवी रणबीरसोबत जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत होती.
खरं तर जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूचे वडील बोनी कपूर यांनीच कन्फर्म करताना म्हटले होते की, ती करण जौहरच्या चित्रपटातूनच डेब्यू करणार आहे. मात्र ती नेमक्या कोणत्या प्रोजेक्टचा भाग बनणार याविषयी मात्र कुठलीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. मोस्ट पॉप्युलर स्टार किड्सपैकी जान्हवी एक असून, सोशल मीडियावर तिची फॅन्स फॉलोइंगची संख्या प्रचंड आहे. तिने लवकरच पडद्यावर झळकावे, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा असेल.