साराने ट्रॅडिशनल अवतारात एंट्री करून अनेकांना चकित केले. तिच्या या ट्रॅडिशनल लूकमुळे ती पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली आहे. हा फॅशन शो दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये सारा आई अमृतासह उपस्थित होती. लहंगा परिधान केलेली सारा या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा साराकडे होत्या. या फॅशन शोमध्ये श्वेता बच्चन आणि जया बच्चन यांनीही हजेरी लावली होती.
वास्तविक या अगोदरदेखील सारा ट्रॅडिशनल अंदाजात बघावयास मिळालेली आहे. परंतु यावेळेस तिचा लूक खूपच सुंदर दिसत होता. यावेळचा साराचा अंदाज कौतुकास्पद होता. शोमध्ये अभिनेत्री सोनम कपूर हिचीही उपस्थिती लक्षणीय ठरली. ती या शोची शो-स्टॉपर होती. दरम्यान सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत दिसणार आहे. या अगोदर ती निर्माता करण जोहर याच्या ‘स्टुडंट आॅफ द इअर-२’ या चित्रपटातून डेब्यू करणार असल्याची चर्चा होती.
परंतु आई अमृताच्या सागण्यावरून तिने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून डेब्यू करण्याचे ठरविले. त्यामुळे करणने साराचा पत्ता कट केला असून, तिच्या जागी श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिला तो संधी देणार असल्याचे समजते. दरम्यान, सारा सध्या इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारा चेहरा आहे.