रणवीरचा हा अंदाज खूपच विचित्र दिसत होता. कारण त्याला बघून असे अजिबातच वाटत नव्हते की, तो बॉलिवूड स्टार आहे. विशेष म्हणजे त्याच्या चाहत्यांना त्याचा हा अंदाज दिसावा म्हणून तो चक्क मुंबईच्या रस्त्यावर या लुकमध्ये आॅटोमध्ये प्रवास करताना दिसला. रणवीरला अशा अवतारात बघून त्याच्या चाहत्यांनी मात्र त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची हौस पूर्ण केली.
गेल्या गुरुवारी रणवीर सिंग त्याचा रॅप साँग लाँच करण्यासाठी अन् प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अशा अंदाजात इव्हेंटस्थळी पोहोचला होता. रणवीरने हे रॅप सॉँग तो अॅड करीत असलेल्या ब्रॅण्डसाठी गायिले आहे. असो, रणवीर सिंग लवकरच ‘जोया अख्तर’च्या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. चित्रपटात तो रॅपरच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. याकरिताच त्याने अशाप्रकारचा अवतार धारण केल्याची सध्या चर्चा आहे.
धारावीच्या झोपडीत राहणाºया एका रॅपरची कथा चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. रणवीर पहिल्यांदाच रॅपरची भूमिका साकारत असल्याने तो या चित्रपटात काम करण्यास खूपच उत्सुक असल्याचे बघावयास मिळते. त्याचबरोबर असेही म्हटले जात आहे की, जोया या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापासूनच चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. त्यामुळे आपल्या भूमिकेला रॅपरचा टच मिळावा म्हणून रणवीर अशाप्रकारची तयारी करीत असताना दिसत आहे. चित्रपटाच्या डिमांडनुसार रणवीर सध्या हिप-हॉप शिकत आहे. त्याव्यतिरिक्त तो झोपडपट्टीत राहणाºया मुलांचे राहणीमानही फॉलो करत आहे.
सध्या रणवीर संजय लीला भंसाली यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात रणवीरसोबत दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट रिलिज अगोदरच वादाच्या भोवºयात सापडला आहे.