खरं तर दीपिकाचा जेव्हा-जेव्हा फोटो काढण्याचा प्रयत्न केला जात होता, तेव्हा-तेव्हा ती मागे वळून बघत होती. गालावर किंचितशी स्माइल अन् त्यामुळे पडलेली खळी दीपिकाचे सौंदर्य अधिकच खुलवत होते. परंतु दीपिका ‘मुड मुड के’ कोणास बघत होती? याचा मात्र अखेरपर्यंत उलगडा होऊ शकला नाही. वास्तविक दीपिकाची ही कृती बरेच प्रश्न उपस्थित करणारी होती. कारण ज्यापद्धतीने ती मागे बघत होती, त्यावरून ती नक्कीच काहीतरी मीडियापासून लपविण्याचा प्रयत्न करीत असावी असे दिसत होते.
दीपिका सध्या संजय लीला भन्साळीच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात ती राणी पद्मावतीची भूमिका साकारताना बघावयास मिळेल. दीपिका व्यतिरिक्त तिचा कथित बॉयफ्रेंड रणवीर सिंंग आणि शाहिद कपूर यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर दीपिका ‘माजिद माजिदी’मध्येही दमदार भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील तिचा लूक सोशल मीडियावर लीक झाला होता. लीक झालेल्या फोटोमध्ये दीपिका अतिशय सामान्य परिवारातील मुलीच्या भूमिकेत असल्याचे दिसत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन हनी त्रेहन करीत आहेत.
दरम्यान, दीपिका तिच्या प्रोफेशनल लाइफबरोबरच रणवीर सिंगबरोबरच्या अफेअरमुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र अद्यापपर्यंत असे कुठलेही संकेत दिसले नसल्याने त्यांचे खरोखरच ब्रेकअप झाला का, याविषयी मात्र शंका निर्माण केली जात आहे.