वास्तविक कॅटचे बहीण इसाबेल हिचे सौंदर्य वेड लावणारे असून, सुंदरतेच्या बाबतीत ती कॅटलाही धोबीपछाड देईल अशाच काहीशा प्रतिक्रिया समोर येत आहेत. वास्तविक इसाबेल कॅटपेक्षाही अधिक नेटसॅव्ही आहे. ती नेहमीच तिचे फोटो इन्स्टावर अपलोड करीत असते. तिचे फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणात असल्याने तिच्या प्रत्येक फोटोंवर कौतुकाचा वर्षावच केला जातो. इसाबेलचे असेच काहीसे फोटो आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत.
कॅटची बहीण असलेल्या इसाबेलला मॉडेलिंगबरोबरच अभिनयातही रस आहे. सध्या बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सलमान खानच प्रयत्न करीत असल्याची माहिती समोर येत आहे. कॅटरिनालादेखील सलमानेच बॉलिवूडमध्ये लॉन्च केले आहे. आता इसाबेललाही लॉन्च करण्याची तयारी केली जात आहे. वृत्तानुसार ३१ वर्षीय इसाबेल एका कॅनेडियन चित्रपटात झळकणार असून, हा चित्रपट सलमान खान प्रोड्यूस करीत आहे.
इसाबेलच्या अभिनयाच्या तयारीविषयी सांगायचे झाल्यास, तिने मॉडेलिंगला सुरुवात केली असून, अनेक शोजमध्ये तिने सहभाग घेतला आहे. शिवाय तिला बहीण कॅटरिनाच्या पावलावर पाऊल ठेवण्याची इच्छा असून, त्यादृष्टीने तिची तयारी सुरू आहे. त्याकरिता तिने सोशल मीडियाचा आधार घेतला असून, आपल्या सौंदर्याने ती याठिकाणी आग लावताना दिसत आहे.
त्याचबरोबर इसाबेलने अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे. स्क्रीनवर इसाबेलचा वावर खूपच आकर्षित करणारा असून, कॅटलाही तिचे सौंदर्य धोबीपछाड देईल असेच काहीसे दिसून येते. आता इसाबेलने लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करावी अशी तिच्या भारतीय फॅन्सची इच्छा असेल, यात शंका नाही.