काल रात्री दोघांनाही मुलगा ऋदान आणि ऋहान यांच्यासोबत मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेर येताना बघण्यात आले. या दोघांचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला होता. मात्र त्यावेळी दोघे एका गोष्टीवर ठाम झाले होते की, मुलांसाठी ते एकत्रित सर्व जबाबदारी पार पाडणार आहेत. एक चांगले माता-पिता म्हणून ते नेहमीच मुलांसोबत राहणार आहेत. त्यामुळेच ते नेहमीच आपल्या मुलांसोबत एकत्र बघायला मिळतात. दरम्यान, काल हृतिक आपल्या ‘वंडर वुमन’सोबत चित्रपट बघण्यासाठी एका चित्रपटगृहात पोहोचला होता. जेव्हा तो आपल्या पूर्ण परिवारासोबत बाहेर पडला तेव्हा पत्रकारांच्या कॅमेºयात कैद झाला.
या अगोदरदेखील हृतिकला त्याची एक्स वाइफ सुजैन खान हिच्याबरोबर जुहू पीव्हीआरमधून बाहेर पडताना बघण्यात आले होते. यावेळी हृतिकने आपल्या परिवारासमवेत ‘बाहुबली-२’ हा चित्रपट बघितला. त्यांच्यातील देहबोली बघता हे दोघे जरी कायदेशीरदृष्ट्या विभक्त झाले असले तरी मनाने अजूनही पती-पत्नीच आहेत.
कारण बºयाचदा या दोघांना एकत्र बघण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून एक बातमी समोर येत आहे की, हृतिकने त्याच्या घरापासून जवळच सुजैनला एक नवे घर खरेदी करून दिले आहे. त्यामुळे हे दोघे पुन्हा एकदा एकत्र आयुष्य सुरू करण्याची चर्चा होती. मात्र सुजैनने ट्विटच्या माध्यमातून या चर्चांना पूर्णविराम दिला होता. तिने म्हटले होते की, मी आणि हृतिक पुन्हा एकत्र येणार आहे. आम्ही केवळ मुलांसाठी चांगले माता-पिता राहणार आहोत.