जेव्हा हे दोघे इव्हेंट ठिकाणी पोहोचले तेव्हा आपापल्या खुर्चीवर बसून इकडे-तिकडे बघत होते. एकमेकांची नजर चुकविण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न होत होता. खरं तर ब्रेकअपनंतर या दोघांना एकत्र बघणे दुर्लभ समजले जात होते. मात्र जेव्हा एकत्र आले तेव्हा जणूकाही त्यांना बळजबरीने बसून ठेवल्याचे दिसून आले. शिवाय त्यांच्या हावभावावरून एकमेकांचे चेहरे बघण्यात त्यांना अजिबात रस नसल्याचेही पावलोपावली जाणवत होते. अनुराग बासू यांनी ‘जग्गा-जासूस’ या चित्रपटासाठी त्यावेळी कॅटरिना आणि रणबीरला साइन केले होते. दोघांमध्ये चांगले आलबेल असल्याने त्यांची केमिस्ट्री चित्रपटात प्रकर्षाने बघावयास मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु शूटिंगदरम्यान त्यांच्या नात्यात ठिणगी पडल्याने त्याचा परिणाम चित्रपटाच्या शूटिंगवर झाला होता.
शूटिंगसाठी दोघांची मनधरणी करताना निर्मात्यांच्या नाकीनव आले होते. असो, आता हे दोघे प्रमोशननिमित्त एकत्र आले असून, त्याचा फायदा चित्रपटाला होणार की नाही, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. खरं तर दोघे अशा पद्धतीने प्रमोशनमध्ये एकत्र येतील, असा विचार त्यांनी कधी केला नसेल. तब्बल सात वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या या दोघांचे ब्रेकअप अनेकांना धक्का देणारे आहे. असो, जेव्हा हे दोघे इव्हेंटस्थळी पोहचले तेव्हा नेमके काय घडले, याविषयी सांगायचे झाल्यास, दोघांनाही एकमेकांप्रती अजिबातच ओढ नसल्याचे दिसून येत होते. दोघांनी एकदाही डोळ्यात-डोळे घालून एकमेकांना बघितले नाही. बघणे तर सोडाच एकमेकांशी व्यवस्थितरीत्या चर्चाही केली नाही. जेव्हा रणबीर काही बोलत होता, तेव्हा कॅटरिना दुसरीकडे बघत होती. जेव्हा कॅट काही बोलत होती, तेव्हा रणबीर तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत होता. शिवाय रणबीर या इव्हेंटमध्ये काहीसा बदलेला बघावयास मिळाला.
खरं तर जेव्हा-जेव्हा रणबीर मीडियाचे कॅमेरे बघतो, तेव्हा त्यांच्यातील उत्सात दुपटीने वाढतो, मात्र यावेळेस त्याच्यात असा कुठलाच उत्साह बघावयास मिळाला नाही. यावेळी रणबीरने हेही सांगितले की, त्याला कशा पद्धतीने कॅटच्या मोस्ट पॉप्युलर डान्स नंबरवर थिरकण्यास राजी केले होते. रणबीरचे हे वक्तव्य ऐकून कॅटरिनादेखील काहीशी आश्चर्यचकित झाली होती. मात्र तिने त्यावर प्रतिक्रिया देण्यास टाळले. बºयाचशा अडचणींनंतर ‘जग्गा जासूस’ येत्या १४ जुलै रोजी रिलीज होणार आहे.