वास्तविक या चित्रपटात फातिमाच्या नावावरून अखेरपर्यंत कन्फ्यूजन होते. अखेर फातिमाचे नाव फायनल करण्यात आले असून, तिला शूटिंगसाठी बोलाविण्यात आले आहे. सध्या फातिमा शूटिंगबरोबर माल्टाचे सौंदर्य अनुभवत आहे. दरम्यान, फातिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. मोकळ्या केसांमध्ये फातिमाचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. काही दिवसांपूर्वीच याच चित्रपटासाठीच्या लुक टेस्टचा एक फोटो समोर आला होता. ज्यामध्ये फातिमाचे डोक्याचे केस लांब दिसत होते. त्यामुळे फातिमा या चित्रपटात अशाच काहीशा अंदाजात बघावयास मिळण्याची शक्यता आहे.
नुकतेच कॅटरिना कैफला मुंबई विमानतळावर बघण्यात आले होते. यावेळी असा अंदाज वर्तविण्यात आला होता की, कॅट माल्टाला रवाना झाली असावी. आतापर्यंत कॅट तिच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. त्यामुळेच तिने ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ टीमशी उशिरा ज्वाइन झाली. हा एक बिग बजेट चित्रपट असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.