चुलबुली आलिया भट्ट करणच्या पार्टीत तिचा आवडता डिझाईनर प्रबल गुरुंग याने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये पोहोचली होती. प्रिंटेड सिल्क जॅकवार्ड व्ही नेक ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. लाईट मेकअप, केसांचा बन आणि लाईट पिंक लिपस्टिक अशा अवतारात आलियाकडे बघतच राहावे, असे तिने स्वत: कॅरी केले होते.
नुकतीच कान्सवरून परतलेली दीपिका पादुकोण यावेळी ब्लॅक कलरच्या मिनी ड्रेसमध्ये पोहोचली. शलिना नथानीने डिझाईन केलेल्या या ड्रेससोबत दीपिकाने कॅरी केला होता तो बोल्ड आय मेकअप. दीपिका या अवतारात प्रचंड ग्लॅमरस अवतारात दिसली.
क्रिती सॅनन यावेळी मल्टी कलर्ड स्ट्रिप शॉट टॉप आणि नेव्ही कलरच्या स्कर्ट पॅन्टमध्ये दिसली. राहुल मिश्राने डिझाईन केलेल्या या ड्रेसमध्ये क्रितीचे सौंदर्य आणखीच खुलून आले होते.
आदिती राव हैदरी यावेळी जम्पसूटमध्ये पोहोचली. पोनी टेल, बोल्ड आय मेकअप अशा बोल्ड अवतारात आदिती करणच्या पार्टीत पोहोचली.