यावेळी दिशा लाइट पिंक कलरच्या कॅजुअल शर्टमध्ये होती. तर टायगरने टीशर्ट आणि ब्यू जीन्स परिधान केली होती. असो, आता या दोघांना प्रेक्षक एकत्र स्क्रिन शेअर करताना बघू इच्छित आहेत. कारण हे दोघांची जोडी नक्कीच प्रेक्षकांना भावेल असेच एकंदरीत चित्र आहे. परंतु निर्माते यांना एकत्र साइन का करत नाहीत, हे मात्र कोडेच आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये टायगरचा बोलबोला आहे. अॅक्शन आणि डान्स स्टाइलने तो अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी झाला आहे. तर टायगरप्रमाणेच दिशाही एक चांगली डान्सर आहे. त्यामुळे या दोघांना एकत्र आणल्यास पडद्यावर त्यांची चांगलीच केमिस्ट्री प्रेक्षकांना बघावयास मिळू शकते.
असो, टायगरविषयी बोलायचे झाल्यास गेल्या काही दिवसांपासून तो भलत्याच विषयामुळे चर्चेत आहे. राम गोपाल वर्मा यांनी त्याला ‘ट्रान्सजेंडर’ म्हटल्याचा एक आॅडिओ लिक झाला होता. त्यामुळे बी-टाउनमध्ये एकच खळबळ उडाली होती. अशातही टायगरने अद्यापपर्यंत वर्मा यांच्यावर पलटवार केलेला नाही; मात्र त्याच्या परिवारातील इतर सदस्यांनी वर्मा यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यामुळे वर्मा यांना त्याची जाहीर माफीही मागावी लागली.