मलाइकाने शेअर केलेला हा फोटो जीममधील असून, दोघीही वर्कआउट करताना चांगलाच घाम गाळताना दिसत आहेत. यावेळी मलाइकाने या फोटोला गमतीशीर कॅप्शन देताना लिहिले की, ‘तीन माकडं लटकलेली, आता मला हे नका विचारू की ती का लटकली. मात्र आम्हाला खूप मज्जा आली. एक तर सारा अली खान अन् दुसरी नम्रता पुरोहित.’ काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री निमरत कौर हिनेही सारासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
सैफ आणि अमृता सिंगची मुलगी असलेली सारा तिच्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. असे म्हटले जात आहे की, सारा ‘स्टूडेंट आॅफ द ईयर-२’मध्ये टायगर श्रॉफच्या अपोझिट झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच निर्माता करण जोहर याने जाहीर केले होते की, २०१२ मध्ये आलेल्या ‘स्टूडेंट आॅफ द ईयर’ या चित्रपटाच्या सीक्वलची निर्मिती करणार असून, यामध्ये टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असेल. मात्र त्याच्या अपोझिट सारा असेल अशी कुठलीही घोषणा करणने केली नसल्याने तिच्या भूमिकेविषयीचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.
नुकतीच सारा करण जोहरच्या बर्थ-डे पार्टीत बघावयास मिळाली होती. या पार्टीतील तिचे काही फोटोज्ही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटोमध्ये सारा बॉलिवूड किंग शाहरूख खान व त्याचा मोठा मुलगा आर्यन यांच्यासोबत मस्तीच्या मूडमध्ये बघावयास मिळाली. आता सारा केव्हा चित्रपटात झळकणार याविषयी तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.