आता तुमच्या डोक्यात असा विचार येत असेल की, रणवीर आणि कॅटरिनामध्ये काही गुफ्तगु तर सुरू नाही ना; मात्र लगेचच असा विचार करणे घाईचे ठरेल. हे दोघे यापार्टीत सहभागी झाले असल्यानेच एकत्र आले होते. सध्या रणवीर याचे नाव दीपिका पादुकोण हिच्याशी जोडले जाते. दीपिका अन् कॅटरिनामध्ये जबरदस्त कॅटफाइट आहे. अशात रणवीरचे नाव कॅटरिनाशी जोडले गेल्यास ही फाइट आणखीनच रंगण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कॅटरिनाचे रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्याने ती सिंगल लाइफ जगत आहे.
असो, पार्टीत दोघांचेही लूक खूपच कूल असे दिसत होते. पार्टीत जरी हे दोघे आले असले तरी त्यांचे कपडे बघून फेरफटका मारण्यासाठीच ते घराबाहेर पडले असावेत असेच दिसत होते. यास एकमेव कारण म्हणजे मुंबईची गरमी. कॅटरिना तर मीडियाचे कॅमेरे बघून खूपच आनंदी असल्याचे दिसून आली. नेहमीसारखे तिने मीडियाला बघून पळ काढला नाही. कारण तिच्या चेहºयावरील स्मित हास्य बघण्यासारखे होते.
या दोघांव्यतिरिक्त अभय देओल, जोया अख्तर हेदेखील पार्टीत सहभागी झाले होते. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’नंतर अभय आणि कॅटरिना पुन्हा एकदा एकत्र आल्याने ते दोघे खूपच खूश असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. रणवीर सिंग लवकरच जोया अख्तरच्या आगामी ‘गली बॉय’ या चित्रपटात झळकणार आहे. ज्यामध्ये तो एका रॅपरच्या भूमिकेत असेल. या चित्रपटात रणवीरबरोबर आलिया भट्ट असेल.
रणवीरने तर या चित्रपटातील एक गाणेही रेकॉर्डिंग केले आहे. तर कॅटरिनाविषयी बोलायचे झाल्यास, ती सध्या सलमान खान याच्यासोबत ‘टायगर जिंदा है’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या सलमान भारतात नसल्याने या चित्रपटाची शूटिंग थांबविण्यात आली आहे. या चित्रपटात कॅटरिना अॅक्शन भूमिकेत बघावयास मिळणार आहे. रणबीर कपूरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरिना सध्या तिच्या जुन्या मित्रांसोबत क्वॉलिटी टाइम व्यतीत करीत आहे.