गेल्या काही काळापासून नर्गिस इंडस्ट्रीमधून गायब आहे. गेल्या वर्षी रितेश देशमुखबरोबर ‘बॅण्जो’ या चित्रपटात झळकलेली नर्गिस सध्या एका हॉलिवूडपटात बिझी आहे. ‘५ वेडिंग्स’ नावाच्या या चित्रपटात ती काम करीत असून, शूटिंगमधून तोडासा वेळ काढून ती थेट थायलंडला पोहोचली आहे. हॉलिडे एन्जॉय करण्यासाठीच तिने ब्रेक घेतला आहे. दरम्यान इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या बºयाचशा फोटोंमध्ये नर्गिस बिकिनीमध्ये दिसत आहे.
मॉडेलिंग ते अभिनय असा प्रवास राहिलेल्या नर्गिसचा बॉलिवूडमध्ये अजूनही स्ट्रगलच सुरू आहे. २०११ मध्ये आलेल्या ‘रॉकस्टार’ या चित्रपटातून नर्गिसने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर ती मद्रास कॅफे (२०१३), मै तेरा हिरो (२०१४), अजहर (२०१६), हाउसफुल ३ (२०१६) या चित्रपटांमध्ये झळकली. गेल्यावर्षी तिचा अभिनेता रितेश देशमुखबरोबर चित्रपट आला होता.
सध्या ती हॉलिवूडच्या वाटेवर असल्याने तिला या चित्रपटातून बºयाचशा अपेक्षा आहेत. आणखीनही ती काही हॉलिवूड प्रोजेक्टवर काम करीत असल्याचे वृत्त आहे. तसेच आगामी काळात बॉलिवूडमध्येही ती काही प्रोजेक्टवर काम करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.