दीपिका पहिल्यांदाच कान्समध्ये सहभागी होणार असून, तिला रेड कार्पेटवर बघण्यासाठी तिचे फॅन्स उत्सुक आहेत. दीपिका १७/१८ मे रोजी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखविणार आहे. तिच्या व्यतिरिक्त लॉरियल पेरिसची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर ऐश्वर्या राय-बच्चन, सोनम कपूर यादेखील आंतरराष्टÑीय कलाकार जूलियन मरे, इवा, लोंगोरिया यांच्यासोबत सहभागी होणार आहेत.
ऐश्वर्या राय १९/२० मे रोजी आणि सोनम कपूर २१/२२ मे रोजी रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याच्या अदा दाखविणार आहेत, अशी माहिती ब्रॅण्ड प्रवक्त्याकडून देण्यात आली आहे. गेल्या रविवारीच दीपिकाने बेंगळुरू येथे एका नातेवाइकाच्या विवाह समारंभात हजेरी लावून चार चॉँद लावले होते. यावेळी दीपिका विवाह समारंभात सर्व पारंपरिक सोहळ्यात सहभागी झाली होती.
आपल्या अतिशय व्यस्त शेड्यूल्डमधून दीपिकाने हजेरी लावल्याने सोहळ्यात एक वेगळीच रंगत निर्माण झाली होती. सध्या दीपिका संजय लीला भंसाली यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात दीपिका व्यतिरिक्त अभिनेता रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रिलीज अगोदरच हा चित्रपट वादाच्या भोवºयात सापडला आहे.