फोनवर बोलताना कॅमेºयात कैद झालेली क्रिती खूपच नाराज दिसत आहे. क्रितीचे हे फोटोज दिग्दर्शक दिनेश विजन यांच्या कार्यालयाबाहेरील आहेत. क्रिती याठिकाणी गाडी पार्किंग एरियामध्ये फिरताना दिसत आहे. क्रितीचे हे फोटो काल सायंकाळचे असून, याचदरम्यान सुशांत सिंग राजपूत त्याची एक्स गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडे हिला भेटण्यासाठी गेल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. सुशांत आणि अंकिता लोखंडवाला परिसरात कॉफी डेटवर गेल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले होते.
सध्या क्रिती आणि सुशांतमध्ये प्रेमप्रकरण बहरत असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. हे दोघेही बºयाच ठिकाणी एकत्र बघावयास मिळत असल्याने ते रिलेशनशिपमध्ये असावेत असा कयास लावला जात आहे. दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलरवरून या दोघांमध्ये चांगलीच केमिस्ट्री रंगली असून, प्रेक्षकांना हा ट्रेलर भावत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.
सुशांत आणि क्रितीचा हा पहिलाच चित्रपट असून, या चित्रपटातूनच त्यांच्यातील लिंकअपच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, ‘राब्ता’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजान यांनी केले असून, हा चित्रपट ९ जून रोजी रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सुशांत आणि क्रिती अमृतसर येथे प्रमोशनसाठी गेले होते.