या फोटोंमध्ये रणबीर हुबेहूब संजय दत्तसारखा दिसत आहे. सध्या संजूबाबा ज्या अवतारात दिसतो अगदी तसाच अवतार रणबीरचा दिसत आहे. या फोटोंवरून एक गोष्ट तर स्पष्ट होत आहे की, सध्या रणबीर संजूबाबाच्या जेलच्या काळातील शूटिंग करत आहे. डोक्याचे आणि दाढीचे केस पूर्णत: पांढरे दिसत असून, त्याचा उभा राहण्याचा अंदाज हुबेहूब संजय दत्तसारखाच दिसत आहे.
जेव्हा या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती, तेव्हा संजय दत्तला अजिबात वाटत नव्हते की, रणबीर त्याची भूमिका साकारू शकेल. त्यातच मधल्या काळात अशाही बातम्या समोर आल्या होत्या की, रणबीर संजूबाबाच्या तारुण्यातील भूमिकेला फारसा न्याय देऊ शकला नाही. त्याचबरोबर इंडस्ट्रीमधील काही लोकांनीदेखील रणबीरच्या संजूबाबा लूकवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच स्क्रीनवर रणबीर संजूबाबा साकारण्यास अयशस्वी ठरेल असाही कयास लावला गेला. परंतु ज्या पद्धतीने रणबीरचा हा लूक समोर आला आहे, त्यावरून तो संजूबाबा साकारण्यास किती मेहनत घेत आहे, हे स्पष्ट होते.
दरम्यान आतापर्यंत रणबीर कपूरचा संजूबाबा लूक जेव्हा-जेव्हा समोर आला आहे, तेव्हा-तेव्हा त्याच्या मेहनतीचे कौतुक केले गेले आहे. शिवाय रणबीरचे टॅलेण्टही यानिमित्त अधोरेखित झाले आहे. आता तुम्ही हे फोटोज् बघून याबाबतचा अंदाजा लावू शकणार की, रणबीर या भूमिकेला न्याय देऊ शकणार की नाही?