नुकतेच या दोघांना निर्माता करण जोहर याच्या पार्टीत बघण्यात आले. जेव्हा हे दोघे पार्टीच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा करण आलियाला हेल्प करताना बघावयास मिळाला. शिवाय त्याने हेही दाखवून दिले की, तो आलियावर किती प्रेम करतो.
या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आपल्या गर्लफ्रेण्डला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून सिद्धार्थ तिची मदत करीत आहे. कारमधून उतरताना तो दरवाजा उघडण्यासाठी तिची मदत करीत आहे. तसेच एखाद्या जेंटलमॅनप्रमाणे अगोदर तिला कारमध्ये बसू देतो अन् नंतर तो ड्रायव्हिंग सिटवर बसतो.
वास्तविक सिद्धार्थ अशी कृती पहिल्यांदाच करीत आहे, असे अजिबात नाही. तर तो जेव्हा संधी मिळेल तेव्हा परफेक्ट बॉयफ्रेण्डचे कर्तव्य पार पाडत असतो. एचटी मोस्ट स्टायलिश अवॉर्डप्रसंगीदेखील सिद्धार्थ आलियाला प्रोटेक्ट करताना बघावयास मिळाला होता, त्यावरून जोरदार चर्चाही रंगली होती.
आलिया आणि सिद्धार्थ बॉलिवूडमध्ये त्यांच्या लव्ह अफेअर रिलेशनवरून नेहमीच चर्चेत असतात. मात्र दोघांपैकी एकानेही हे नाते उघडपणे स्वीकारले नाही. आम्ही चांगले मित्र असल्याचेच ते आतापर्यंत बोलत आले आहेत. मात्र काहीही असो हे दोघेही त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी सीरियस आहेत.