अंकिता ही पेशाने एअर होस्टेस असल्याचे कळतेय. मिलिंद व अंकिता गतवर्षी आक्टोबरपासून एकमेकांना डेट करत असल्याचे समजतेय. मिलिंदने अंकितासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. केवळ इतकेच नाही तर या फोटोंना ‘फॉरऐवर’ असे कॅप्शन दिले आहे. ‘या व्यक्तीवर प्रेम आहे,’ असे सांगून त्याने अंकितावरच्या प्रेमाची कबुलीही दिली आहे.
ALSO READ : ‘गर्लफ्रेन्ड’ शुभ्रा शेट्टीसोबत इंटिमेट होताना दिसला अनुराग कश्यप!
सुपरमॉडेल, अभिनेता, निर्माता अशी मिलिंदची ओळख आहे. २००६ मध्ये मिलिंद सोमणने फ्रेंच अभिनेत्री मिलेन जम्पनोइ हिच्यासोबत लग्न केले होते. अर्थात हे नाते फार काळ टिकले नाही. मिलिंद ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात अखेरचा दिसला होता. सध्या मिलिंद फिटनेस प्रमोटर आहे. १९ जुलै २०१६ रोजी मिलिंदने आयर्न मॅन कॉन्टेस्ट जिंकले होते. ३.८ किमी स्विमींग, १८०.२ किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी रनिंग १५ तास १९ मिनिटांत पूर्ण करत त्याने हा किताब आपल्या नावावर केला होता.