ALSO READ : WATCH : ४० च्या दशकातील ‘ट्रेन’ अन् कंगना राणौतचा ‘टिप्पा’ डान्स!
काळ्या रंगाची कॅप, काळ्या रंगाचा ड्रेस, काळ्या रंगाचीच सँडल आणि हातात काळ्या रंगाचाच हंटर, अशा अवतारात कंगना या इव्हेंटमध्ये दिसली. ती केवळ हंटर हातात घेऊन आली नाही तर तिने तो चालवला देखील.
ALSO READ : कंगना राणौतचा आरोप : हृतिकने माझे करिअर संपवण्यासाठी सगळे प्रयत्न केलेत
‘रंगून’ हा चित्रपट एक ‘इंटेन्स लव्ह स्टोरी’ आहे. या पीरियड ड्रामाचा ट्रेलर लोकांना चांगलाच भावला आहे. याशिवाय यातील ‘मेरे पिया गये इंग्लंड’,‘ये इश्क’, ‘ब्लडी हेल’ आणि ‘टिप्पा’ या गाण्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. विशाल भारद्वाज यांचा पीरियड रोमॅन्टिक ड्रामा असलेल्या या चित्रपटात सैफ अली खान, शाहिद कपूर आणि कंगना राणौत अशा तिघांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. यात ‘वॉर’ आहे आणि ‘लव्ह’ सुद्धा. यात शाहिद एका लष्करी अधिकाºयाच्या तर सैफ एका रॉयल भूमिकेत आहे.