आलिया कायम स्वत:चे बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आईइतकीच मी सुद्धा बोल्ड आहे, हे सांगण्यात पूजाने जराही कसर सोडलेली नाही. आपल्या अनेक फोटोंमुळे आलियाला टीकेलाही सामोरे जावे लागले. पण त्यामुळे तिला अजिबात फरक पडत नाही.
आलियाने अलीकडे वयाची २० वर्षे पूर्ण केलीत. पण इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोवर्सची संख्या म्हणाल तर लाखांत आहे. होय, ३ लाखांवर तिचे फॉलोवर्स आहेत. कबीर बेदीची नात आणि पूजा बेदीची मुलगी आलिया फॅशन इंडस्ट्रीतील एका नावाजलेला चेहरा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आलियाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा सुरु आहे. छोट्या पडद्यावरील ‘माँ एक्सचेंज’ या शोमध्ये ती दिसली आहे.
खाण्यापिण्याची शौकीन असलेल्या आलियाला नवनवी आव्हाने पेलायला आवडतात. फेमिना मॅगझिनच्या कव्हरपेजवर आईसोबत ती झळकलेली आहे. तिला टॅटूचा शौक आहे. पाठ आणि शरिरावर अनेक ठिकाणी तिने टॅटू गोंदवून घेतले आहेत. याशिवाय पेंटींग, क्रिएटीव्ह राईटींग, कुकिंग, फिल्म मेकिंग हेही तिला आवडते.