Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' कोरिओग्राफरवर जडलं प्रेम, पण अधुरीच राहिली संजय लीला भन्साळींची प्रेम कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 13:33 IST

1 / 8
बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर संजय लीला भन्साळी आज 61 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 'खामोशी' सिनेमापासून त्यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली.'देवदास','हम दिल दे चुके सनम', 'गुजारिश', 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी','ब्लॅक' अशा एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन, निर्मिती केली आहे.
2 / 8
संजय लीला भन्साळींचं वैयक्तिक आयुष्य गेल्या काही वर्षांपूर्वी खूप चर्चेत होतं. पडद्यावर लव्हस्टोरी यशस्वीपणे दाखवणाऱ्या भन्साळींच्या खऱ्या आयुष्यातील स्टोरी मात्र अधुरीच राहिली.
3 / 8
संजय भन्साळी यांचं लग्न झालेलं नाही. ते अविवाहित आहेत. पण त्यांच्या आयुष्यात कोणी आलंच नाही का? तर असं नाही. १९९९ साली आलेल्या 'हम दिल दे चुके सनम' सिनेमावेळी सलमान खान-ऐश्वर्याची केमिस्ट्री खूप आवडली होती. तर पडद्यामागे संजय भन्साळी यांचं एका मुलीवर प्रेम जडलं होतं. कोण होती ती?
4 / 8
'हम दिल दे चुके सनम'मध्ये गाजलेल्या 'ढोली तारो ढोल बाजे' गाण्याची कोरिओग्राफर वैभवी मर्चंटने या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. वैभवी आणि संजय भन्साळी यांच्यात मैत्री झाली. इथूनच त्यांच्या प्रेमाचीही सुरुवात झाली.
5 / 8
२००७ साली आलेल्या 'सांवरिया' सिनेमावेळी संजय भन्साळी आणि वैभवी यांनी साखरपुडा केल्याचीही चर्चा झाली. तसंच दोघंही लवकरच लग्नबंधनात अडकणार असंही बोललं गेलं.
6 / 8
मात्र पुढे हे सगळं अफवा असल्याचंही समोर आलं. दोघांमध्ये बरेच मतभेद होते. त्यांच्यात स्ट्राँग बॉन्ड राहिला नसल्याचंही जाणवलं. त्यामुळे लग्नापर्यंत गोष्टी पोहोचल्या नाहीत. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने नातं थांबवलं.
7 / 8
वैभवी मर्चंट एका मुलाखतीत म्हणाली होती की,'आम्ही आजही खूप चांगले मित्र आहोत. पण मी खूप लाजाळू आहे त्यामुळे मी सार्वजनिक ठिकाणी मी बॉयफ्रेंडच्या हातात हात घालून फिरु शकत नाही. मला तो फार दिखावा वाटतो. आम्हाला वाटलं होतं की आमच्यात काहीतरी केमिस्ट्री असेल पण तसं काही झालं नाही.'
8 / 8
अशा प्रकारे संजय लीला भन्साळींची लव्हस्टोरी शेवटपर्यंत अधुरीच राहिली. पण दोघंही आजही अविवाहित आहेत. वैभवीनेही कोणीशीच लग्न केलं नसून ती एकटीच आयुष्य जगत आहे.
टॅग्स :संजय लीला भन्साळीनृत्यदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टबॉलिवूड