Join us  

सलमान खान साकारणार होता प्रभू श्रीरामाची भूमिका, 40 टक्के शूटिंगही झालं; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 5:25 PM

1 / 8
अयोध्या श्रीरामजन्मभूमी येथे बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामाचे भव्य मंदिर उभारण्यात आले. २२ जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन आणि प्राणप्रतिष्णा सोहळा पार पडला. अनेक बॉलिवूड कलाकार या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
2 / 8
आतापर्यंत रामायणावर आधारित मालिका, सिनेमांमध्ये अनेकांनी प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली आहे. रामानंद सागर यांच्या रामायणातील श्रीरामाच्या भूमिकेत दिसलेले अभिनेते अरुण गोविल आजही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आहेत. अजूनही रामायणावर सिनेमे येत आहेत आणि वेगवेगळे कलाकार यामध्ये भूमिका साकारत आहेत.
3 / 8
बॉलिवूड अभिनेता सलमान खानलाही (Salman Khan) ही सुवर्णसंधी मिळाली होती. होय, सलमान खानचा लहान भाऊ दिग्दर्शक सोहेल खानने 'राम' सिनेमाची घोषणा केली होती. सिनेमाची स्टारकास्टही ठरली होती. सोनाली बेंद्रेला सीतामातेच्या भूमिकेत होती. मात्र अचानक सोनालीच्या जागी पूजा भटला घेण्यात आले.
4 / 8
सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली होती. 40 टक्के चित्रीकरण पार पडलं होतं. सलमान खानने तर प्रभू श्रीरामाच्या वेशात, हातात धनुष्यबाण घेऊन प्रमोशनही केलं होतं.
5 / 8
ऐनवेळी सिनेमाबद्दल अशा काही बातम्या आल्या ज्यामुळे शूटिंग पूर्णपणे थांबलं. याला कारण ठरला स्वत: सोहेल खान. सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच सोहेल आणि पूजा भट यांच्यात जवळीक वाढली. त्यांच्या अफेअरच्याही चर्चा सुरु झाल्या.
6 / 8
सोहेल आणि पूजाबद्दल जेव्हा सलीम खान यांना कळलं तेव्हा त्यांनी सोहेलला ताबडतोब सगळं थांबवण्यास सांगितलं. सलीम खान यांची दोघांच्या नात्याला मंजुरी नव्हती. सलमान खानने मध्यस्थी करत हे सोडवण्याचाही प्रयत्न केला मात्र तोही अयशस्वी झाला.
7 / 8
पूजा भट खान परिवाराला फारशी आवडली नव्हती. तिला सलीम खान यांच्याकडून तर कडाडून विरोध होता. हे बघून पूजाने थेट सिनेमा अर्धवट सोडला. या सर्व अडचणींनंतर सिनेमा पुन्हा कधी बनूच शकला नाही.
8 / 8
यामुळे सलमान खानच्या हातातून महत्वाची भूमिका निसटली. तसंच तेव्हापासून आजपर्यंत पूजाने सलमानसोबत एकही सिनेमा केलेला नाही. आलिया भटच्या लग्नात खान कुटुंब आणि पूजा भट एकमेकांच्या समोर आले होते. तेव्हा त्यांच्यात आता सर्वकाही ठीक असल्याचं स्पष्ट झालं.
टॅग्स :सलमान खानबॉलिवूडरामायणपूजा भटसोहेल खान