Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानने डेब्यू केला तेव्हा अगदीच लहान होत्या त्याच्या या 10 हिरोइन; दोघींचा तर जन्मही झाला नव्हता!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 15:25 IST

1 / 10
करिना कपूरचा जन्म 1980 सालचा. सलमानचा डेब्यू झाला तेव्हा करिना केवळ 8 वर्षांची होती. याच करिनासोबत सलमानने बॉडीगार्ड व बजरंगी भाईजानमध्ये काम केले आहे.
2 / 10
अनुष्का शर्माचा जन्म 1988 सालचा. अनुष्काने सलमानसोबत ‘सुल्तान’ सिनेमात काम केले. सलमानने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला तेव्हा अनुष्का सहा महिन्यांचीही नव्हती.
3 / 10
सलमानचा इंडस्ट्रीत डेब्यू झाला तेव्हा सोनम कपूर केवळ 3 वर्षांची होती. हीच सोनम पुढे ‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमात सलमानसोबत रोमान्स करताना दिसली.
4 / 10
प्रियंका चोप्राचा जन्म 1982 सालचा. सलमानचा पहिला सिनेमा रिलीज झाला तेव्हा प्रियंका 6 वर्षांची होती. दोघांनी ‘मुझसे शादी करोगी’ व ‘सलाम ए इश्क’ या सिनेमात एकत्र काम केले.
5 / 10
दिशा पाटनी हिचा जन्म 1992 सालचा. म्हणजेच सलमानचा इंडस्ट्रीत डेब्यू झाला तेव्हा तिचा जन्मही झाला नव्हता. सलमानच्या डेब्यू सिनेमानंतर चार वर्षांनी ती जन्मली. पण हीच दिशा पाटनी सलमानची हिरोईन म्हणून दिसली.
6 / 10
जॅकलिन फर्नांडिसचा जन्म 1985 सालचा. सलमानच्या डेब्यूवेळी ती केवळ तीन वर्षांची होती. दोघांनी ‘रेस’ या सिनेमात काम केले.
7 / 10
सोनाक्षी सिन्हाचा जन्म 2 जून 1987 रोजी झाला. सलमानच्या डेब्यूवेळी ती एक वर्षाची होती. सलमानने सोनाक्षीसोबत दबंग, दबंग 2 आणि दबंग 3 मध्ये काम केले.
8 / 10
सई मांजरेकर ‘दबंग 3’मध्ये सलमानसोबत रोमान्स करताना दिसली. सईचा जन्म 1988 सालचा़ म्हणजेच, तिच्या जन्माआधीच सलमानचा डेब्यू झाला होता.
9 / 10
कतरिना कैफने सलमानसोबत अनेक सिनेमात काम केले. सलमानचा डेब्यू झाला तेव्हा ती केवळ 5 वर्षांची होती.
10 / 10
जरीन खानला सलमाननेच लॉन्च केले. 1987 साली तिचा जन्म झाला. सलमानच्या डेब्यूवेळी ती केवळ एका वर्षाची होती.
टॅग्स :सलमान खान