आशा भोसले, अंजली तेंडूलकर यांच्याशिवाय शंकर महादेवन, जॅकी श्रॉफ, ऋषी कपूर, पूनम ढिल्लो, पद्मिनी कोल्हापुरे, तेजस्विनी कोल्हापुरे असे सगळेजण यावेळी दिसले.
सारा तेंडूलकर मोस्ट पॉप्युलर क्रिकेटर किड आहे. सचिनची मुलगी असूनही सारा लाईमलाईटपासून दूर राहते. अर्थात जेव्हा केव्हा एखाद्या इव्हेंटला पोहोचते, तेव्हा ती हमखास चर्चेत येते. ग्लॅमरस सारा बॉलिवूड डेब्यू करणार, अशी मध्यंतरी चर्चा होती. अर्थात ही चर्चा फक्त चर्चाच ठरली. स्वत: सचिनने या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. क्रिकेट जगतात सचिन हा सगळ्यांचा आदर्श आहे. पण प्रत्यक्षात सचिनची प्रेरणा कोण, तर त्याची मुलगी सारा. सारा ही माझी प्रेरणा असल्याचे सचिन कायम सांगत आला आहे. स्वत:च्या आधी इतरांचा विचार करणाºया साराने सचिनला चॅरिटीसाठी दान करण्याची शिकवण दिलीय. स्वत: सचिनने एका मुलाखतीत ही माहिती दिली होती.
जनाईबद्दल सांगायचे तर ती आशा भोसेले यांचा मुलगा आनंद याची मुलगी आहे. २०१३ मध्ये आलेल्या ‘माई’मधून जनाईने आपल्या पार्श्वगायनाची सुरुवात केली होती. आशा भोसलेंसोबत काही मंचावरही जनाई दिसली आहे. माझ्या नातीला मोठी पार्श्वगायिका बनवणे हे, माझे पुढचे लक्ष्य आहे, असे आशा भोसले एका इव्हेंटदरम्यान म्हणाल्या होत्या.