करण जोहर
ही खरंच खुप दु:खदायक बातमी आहे. एक कलाकार म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व फार वेगळे होते. त्यांच्यासाठी दिग्दर्शन करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.
प्रियांका चोप्रा
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या जाण्याने इंडस्ट्रीची खुप मोठी हानी झाली आहे. त्या नेहमीच बॉलिवूडच्या एक चांगल्या आई राहतील.
अनुष्का शर्मा
प्रेमळ आणि प्रगल्भ असलेलं त्यांचं व्यक्तिमत्त्व नेहमीच सर्वांना आवडत होतं. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या सर्वांना धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबियांचे मी सांत्वन करते.
अक्षय कुमार
एक चांगली कलाकार आणि माणूसही. त्यांच्यासोबत मला काम करायला मिळाले हे माझे भाग्य. तुमच्या आत्म्याला शांती मिळो.
ऋषी कपूर
तुमच्या आत्म्याला शांती मिळो. काही चित्रपटांत त्यांच्यासोबत काम करता आले. एक चांगल्या कलाकार होत्या.
श्रिया पिळगांवकर
रिना मावशी आज सकाळी गेली. त्यांच्या जाण्याने खुप मोठी हानी झाली आहे. खुप आठवण होत आहे तुझी.
रागिनी खन्ना
तुमच्या आत्म्याला शांती लाभो. तुमची खुप आठवण येणार.
रितेश देशमुख
खुपच दु:खदायक आणि धक्कादायक बातमी आहे. आम्हाला तुमची खुप आठवण येईल. तुमच्या जाण्याने खुप मोठी हानी झाली आहे.
फराह खान
रिमा लागू गेल्या हे कळताच खुप धक्का बसला. खुप गाण्यांमध्ये तिच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.