‘रईस’ सोबतच्या ज्या संघर्षाबद्दल बोलले जातेय ते ‘काबील’च्या तारीख बदलण्यासाठी मुख्य कारण नाहीच. झालं असं की, साधारणपणे चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत असतात. पण, राकेश रोशनच्या होम प्रोडक्शनचा हा चित्रपट असल्याने त्यांनी डिस्ट्रिब्युटर्सला विनंती केली की, चित्रपटाची रिलीज डेट जर २५ करण्यात आली तर २६ जानेवारीला ‘प्रजासत्ताक दिन’निमित्त चित्रपटाची बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई होऊ शकेल. राकेश रोशन यांना चित्रपटाच्या कथानकावर एवढा विश्वास आहे की, चित्रपट २६ जानेवारीला नक्कीच गर्दी खेचून आणेल.
दिग्दर्शक किंवा निर्माता असल्यावर चित्रपट बॉक्स आॅफिसवर कशी कमाई करेल अशी भीती त्यांना सतावतेच. काय केले म्हणजे चित्रपटाला पसंती मिळेल आणि रेकॉर्डब्रेक कमाई होईल, असा विचार त्यांच्या डोक्यात सतत सुरूच असतो. त्यामुळे अशा राष्ट्रीय दिवसांचा आधार घेतला जातो. राकेश रोशन हे सध्या त्याच शोधात आहेत. पाहूयात, एवढे करूनही ‘काबिल’ ला कसा प्रतिसाद मिळतोय ते!