'३ इडियट्स'चा 'सेंटीमीटर' आठवतोय? मराठमोळ्या अभिनेत्याने साकारलेली ही भूमिका, आता ओळखणं झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:22 IST
1 / 11'३ इडियट्स' चित्रपटाची गणना क्लासिक चित्रपटांमध्ये होते. गेल्या १६ वर्षांत या चित्रपटाने अनेकांच्या आयुष्यावर खोलवर प्रभाव टाकला आहे. या चित्रपटात 'सेंटीमीटर' नावाचे एक पात्र होते. ही भूमिका साकारणारा अभिनेता आता खूप बदलला आहे.2 / 11राजकुमार हिराणी यांच्या सुपरहिट चित्रपट '३ इडियट्स'ने भारतीय सिनेमावर एक अमिट छाप सोडली. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप पसंती मिळाली. या चित्रपटात आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांच्यासारख्या मोठ्या स्टार्ससोबत एक छोटी पण अविस्मरणीय भूमिका होती, ती म्हणजे सेंटीमीटरची, जी अभिनेता दुष्यंत वाघ याने साकारली होती. 3 / 11चित्रपटाची लोकप्रियता इतकी होती की आजही लोक त्याला त्याच्या भूमिकेच्या नावाने ओळखतात. मात्र, वेळेनुसार दुष्यंतचा 'लूक' आणि अभिनय शैली दोन्ही खूप बदलले आहेत.4 / 11दुष्यंत वाघचे हे ट्रान्सफॉर्मेशन खूप चर्चेत राहिले आहे. त्याचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात, जे पाहून लोकांना आश्चर्य वाटते. त्याच्या नवीन रुपात, तोच निरागस आणि खोडकर सेंटीमीटर आहे हे ओळखणे कठीण आहे. 5 / 11दुष्यंतचे फोटो नेहमीच चर्चेत असतात. त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर एका युजरने कमेंट केली, 'अरे, हा सेंटीमीटर किती बदलला आहे!', तर दुसऱ्याने लिहिले, 'भावा, किलर दिसतोयस!' आजही त्याचे चाहते त्याच्या स्माइलचे वेडे आहेत.6 / 11करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, दुष्यंत वाघने आपल्या अभिनयाची सुरुवात २००० साली 'तेरा मेरा साथ रहे' या चित्रपटातून केली होती, ज्यात त्याने अजय देवगणच्या धाकट्या भावाची आणि एका 'स्पास्टिक' मुलाची भूमिका साकारली होती. 7 / 11यानंतर त्याने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले. मात्र, त्याला खरी ओळख '३ इडियट्स'मधील मिलीमीटर उर्फ सेंटीमीटरच्या भूमिकेतून मिळाली. खरं तर, मिलीमीटरच्या भूमिकेत आधी राहुल दिसला होता, पण नंतर मोठ्या मिलीमीटरच्या भूमिकेत दुष्यंत दिसला आणि त्याला नवीन नाव मिळालं - सेंटीमीटर.8 / 11दुष्यंत केवळ चित्रपटांपुरता मर्यादित राहिला नाही. तो टेलिव्हिजनच्या दुनियेतही खूप सक्रिय होता. त्याने लोकप्रिय टीव्ही शो 'ना बोले तुम ना मैंने कुछ कहा' मध्ये गुरूची भूमिका साकारली होती, जो मुख्य पात्र मोहन (कुणाल करण कपूर) चा मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ होता. 9 / 11दुष्यंत सांगतो, 'विनोद चोप्राच्या प्रॉडक्शन हाऊसने मला आधी 'लगे रहो मुन्नाभाई' साठी बोलावले होते, पण गोष्ट जमली नाही. नंतर त्यांनी मला '3 इडियट्स' साठी कास्ट केले आणि तोच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला.'10 / 11एका कलाकारासाठी सर्वात मोठी उपलब्धी ही असते की लोक त्याला त्याच्या भूमिकेमुळे ओळखतात, असे दुष्यंत मानतो. तो हसून सांगतो, 'सुरुवातीला, शोचे मुख्य अभिनेता कुणाल मला मिलीमीटर किंवा सेंटीमीटर म्हणून हाक मारायचा.' 11 / 11सध्या दृष्यंत झी मराठीवरील लक्ष्मीनिवास मालिकेत काम करताना दिसतो आहे. याआधीही त्याने बऱ्याच हिंदी व मराठी मालिकेत काम केले आहे.