By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 12:25 IST
1 / 10रवीना टंडन बॉलिवूडमध्ये आली आणि नव्वदीचा काळ रवीनाने अक्षरश: गाजवला होता. आजही रवीना टंडनचा चाहता वर्ग तितकाच मोठा आहे. पण सध्या चर्चा ‘मस्त मस्त गर्ल’ची नाही तर तिची लेक राशाची आहे...2 / 10होय, रवीनाची लेक राशा थडानी सध्या जाम चर्चेत आहेत. तिचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.3 / 10राशा आता बरीच मोठी झाली आहे आणि अनन्या पांडे, जान्हवी कपूर, खुशी कपूर, न्यासा देवगण या स्टारकिड्स सारखीच तिचीही चर्चा होताना दिसतेय.4 / 10राशाची आई रवीना सुंदर आहेच. पण राशाही आई इतकीच सुंदर आहे. चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत.5 / 10राशाची स्टाइल आणि अदा पाहून ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल असं वाटत आहे. सध्या जिकडे तिकडे राशाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा सुरू आहे. 6 / 10राशा बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार का? यावर अलीकडे रवीना बोलली होती. सध्या तरी तिचा असा कोणताच प्लॅन नसल्याचं ती म्हणाली होती.7 / 10 राशाने बॉलिवूडमध्ये यावं का? आई म्हणून तुला काय वाटतं? असं विचारल्यावर, मला असं अजिबात वाटत नाही. पण आजकालची मुलं स्वत:चे निर्णय स्वत:ल घेतात. हे तिचं आयुष्य आहे त्यामुळे तिने तिची स्वप्न पूर्ण करावी, असं रवीना म्हणाली होती.8 / 10 रवीनाची ग्लॅमरस लेक राशा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते.9 / 10राशा नुकतीच 17 वर्षांची झाली. बॉलिवूडमधल्या अनेक स्टारकिड्सप्रमाणेच तिने मुंबईतील धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. 10 / 102004 मध्ये रवीनानं अनिल थडानीसोबत लग्न केलं आणि 2005 मध्ये तिनं राशाला जन्म दिला. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 1995 मध्ये रवीनाने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं.