रश्मिकाचा प्रत्येक फोटो तुम्हाला प्रेमात पाडेल...; पाहा, श्रीवल्लीचे ‘किलर’ फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 10:01 IST
1 / 10साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना आताश: नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. तिचं नाव माहित नाही, अशी व्यक्ति विरळीच.2 / 10चार वर्षांआधी रश्मिका मंदाना हे नाव फार कुणाला ठाऊकही नव्हतं. आज अख्ख्या जगात रश्मिकाचे फॅन्स आहेत.3 / 10गेल्या चार वर्षांत तिनं नाव कमावलं, ऐश्वर्य कमावलं. 5 एप्रिल 1996 रोजी कर्नाटकच्या कोडागु येथे जन्मलेल्या रश्मिकाने 2016 मध्ये ‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटाद्वारे अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली होती.4 / 10रश्मिकाचा पहिलाच सिनेमा गाजला. बेस्ट डेब्यू अॅक्ट्रेस इन कन्नडचा पुरस्कार तिला मिळाला. शिवाय या पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर रश्मिका प्रेमातही पडली.5 / 10होय, त्यावेळी तिचं वय होतं उणंपुरं 19. ‘किरिक पार्टी’चं शूटींग सुरू असतनाच रश्मिका तिचा सहअभिनेता रक्षित शेट्टीवर भाळली.6 / 10इतकी भाळली की, काहीच महिन्यांत तिने रक्षितसोबत साखरपुडाही उरकला. जुलै 2017 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला. पण हे नातं फार टिकलं नाही.7 / 10सप्टेंबर 2018 मध्ये रश्मिकाने साखरपुडा मोडला. यानंतर रश्मिका काही काळ नैराश्यात गेली होती. पण ती लगेच सावरली आणि तिनं स्वत:ला कामात झोकून दिलं.8 / 10तिच्या कष्टाचं फळ तिला मिळालंय. गेल्या चार वर्षात रश्मिका साऊथची नंबर 1 अभिनेत्री बनली आहे. साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते.9 / 10मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका एका चित्रपटात काम करण्यासाठी सुमारे 3 ते 4 कोटी रुपये घेते. रिपोर्टनुसार, रश्मिकाकडे 30 कोटींची संपत्ती आहे. बेंगळुरूमध्ये तिच्याकडे आलिशान व्हिला देखील आहे. त्याची किंमत 8 कोटी आहे.10 / 10रश्मिकाकडे लक्झरी व अलिशान गाड्या आहेत. 50 लाखांची मर्सिडीज बेंझ सी-क्लास, 40लाखांची ऑडी क्यू 3, टोयोटा इनोव्हा आणि ह्युंदाई क्रेटा अशा गाड्यांमधून ती फिरते.