Join us  

रश्मिका मंदाना ते समंथा! साऊथच्या अभिनेत्रींचे डबिंग आर्टिस्ट कोण माहितीयेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 4:43 PM

1 / 7
गेल्या काही वर्षांमध्ये दाक्षिणात्य कलाविश्वाने संपूर्ण जगभरात आपली हक्काची जागा निर्माण केली आहे. त्यामुळे सर्व स्तरांमधून या साऊथ मुव्हींना विशेष पसंती मिळत आहे.यात अनेक चित्रपटांचे हिंदी व्हर्जनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळेच हिंदीत डब झालेल्या चित्रपटातील अभिनेत्रींना नेमकं कोणत्या डबिंग आर्टिस्टने आवाज दिलाय ते पाहुयात.
2 / 7
तोशी सिन्हा - डबिंग आर्टिस्ट तोशी सिन्हा हिने अनुष्का शेट्टीच्या भागमती आणि मिर्ची या चित्रटांच्या हिंदी व्हर्जनला आवाज दिला आहे.
3 / 7
शाइनी प्रकाश - F2: Fun and Frustration मध्ये शाइनी प्रकाश हिने तमन्ना भाटियाचा आवाज हिंदीमध्ये डब केला आहे.
4 / 7
नंदनी शर्मा - रश्मिका मंदानाच्या गीता गोविंदच्या हिंदी डबसाठी नंदनी शर्माने तिचा आवाज दिला आहे.
5 / 7
शगुफ्ता बेग - थेरी या चित्रपटासाठी शगुफ्ता बेग हिने समंथासाठी हिंदी डबिंग केलं आहे. तसंच तिने तापसी पन्नूसाठी द रिअल जॅकपॉट, काजल अग्रवालचा जंहबाज, हिरो नंबर झीरो २ या चित्रपटांसाठीही हिंदी डबिंग केलं आहे.
6 / 7
उर्वी आशर - श्रुती हासनच्या Lucky The Racer आणि पुलिसवाला गुंडा या काजल अग्रवालच्या चित्रपटासाठी उर्वीने हिंदी डबिंग केलं आहे.
7 / 7
पूजा पंजाबी - इन्स्पेटक्टर विजयमध्ये पूजाने काजल अग्रवालला आवाज दिला आहे.
टॅग्स :Tollywoodसिनेमासेलिब्रिटीरश्मिका मंदानासमांथा अक्कीनेनीकाजल अग्रवाल