प्रीमिअरनंतर साहजिक रंगली ती पार्टी. या पार्टीतही रणवीर आणि दीपिका या दोघांवरच सगळ्यांच्या नजरा खिळल्या. दीपिका आणि रणवीरने या पार्टीत अतिशय स्टाईलिश एन्ट्री घेतली. शॉर्ट रेड ड्रेसमधील दीपिका आणि ब्लॅक सूटमधील रणवीर या हॉट कपलची एन्ट्री होताच मीडियाचे कॅमेरे त्यांच्याकडे वळले. दीपिकाच्या हॉलिवूड डेब्यूचा आनंद रणवीरच्या चेहºयावर स्पष्टपणे जाणवत होता. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे रणवीर यावेळी म्हणाला, ते याचमुळे.
‘एक्सएक्सएक्स: दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ या हॉलिवूडपटाच्या प्रमोशनसाठी विन भारतात आला आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणही मुख्य भूमिकेत आहे. लंडनमध्ये चित्रपटाचा प्रचार केल्यानंतर काल दीपिका ‘एक्सएक्सएक्स’च्या टीमसह भारतात परतली. ‘एक्सएक्सएक्स: दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा सर्वप्रथम भारतात रिलीज होणार आहे. येत्या १४ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अन्य देशांत तो १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
विन व दीपिका यांच्यासह डोनी येन, निना डोबे्रव्ह, रूबी रोज आणि सॅम्युअल एल.जॅक्सन हे हॉलिवूड स्टारही या चित्रपटात झळकणार आहेत. ‘एक्स एक्स एक्स : दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा सन २००२ मध्ये अलेल्या ‘एक्स एक्स एक्स’ आणि २००५ मध्ये आलेल्या ‘एक्स एक्स एक्स : स्टेट आॅफ द युनियन’चा सीक्वल आहे.