गोविंदा त्याची पत्नी सुनीता अहुजा, मुलगी टीना अहुजा आणि मुलगा यशवर्धन यांच्यासह होळीचे रंग खेळले. विविध रंगांच्या होळीचा आनंद त्याने लुटला.
पत्नी सुनीता अहुजासोबत होळी खेळण्यासाठी असा सज्ज झाला होता आपला लाडका गोविंदा.
‘आ गया हिरो’ या आगामी चित्रपटामुळे गोविंदा चर्चेत आहे. त्याच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून त्याने फॅमिलीसोबत होळी खेळणे पसंत केले. पत्नी सुनीता गोविंदाला रंग लावत असताना...
मुलगी टीना तिचा भाऊ यशवर्धनला यावेळी रंग लावताना दिसतेय. सोबतच गोविंदा आणि सुनीता हे एकमेकांसोबत होळीचा आनंद लुटत आहेत.