दंगल हा चित्रपट पाहिल्यावर ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया देताना रामगोपाल वर्मा यांनी ‘दंगल’ या चित्रपटासाठी आमीर खानची प्रशंसा केली आहे. राम गोपाल वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहलेय. ‘‘आमीर खानच्या चित्रपटातून भारतातील परिदृश्ये जगाने गंभीरतेने घ्यावी अशा संदेश देणारी असतात तर अन्य खानचे चित्रपट मूर्खपणा व मागसलेपणा दाखविणारी आहेत’’. यानंतर राम गोपाल वर्मा यांनी दंगलची प्रशंसा करताना ट्विटरवर पोस्टची रिघच लावली एका पोस्टमध्ये त्याने आमीर चे पायाचा स्पर्श करावा, हे शक्य नाही कारण त्याचा आलेख उत्तरोत्तर वाढत चालला आहे, असा उल्लेख केला आहे.
राम गोपाल वर्मा यांनी केलेल्या ट्विटर पोस्टमधून त्याने आलम आराचा उल्लेख करून मुलीच्या बापांची भूमिका करण्यासाठी कोणता अभिनेता वजन वाढविणे एवढ्या गंभीरतेने घेईल. दंगलची प्रशंसा करताना रामूने तब्बल सहा ट्विट पोस्ट केले. मात्र त्याच्या या पोस्टवर सलमान व शाहरुखच्या चाहत्यांनी आक्षेप नोंदविले असून काहींनी त्याला ‘स्वदेश’ व ‘चक दे इंडिया’ची आठवण करून दिली आहे. राम गोपाल वर्मा यांनी आमीर खानसोबत ‘रंगीला’ हा चित्रपट केला होता. शाहरुख व सलमान यांच्या सोबत अद्याप रामूने काम केले नाही.
आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाºया चित्रपटांच्या यादीत दुसºया स्थानी आला असून आगामी दिवसांत तो सुल्तानचा रेकॉर्ड मोडणार असे भाकित वर्तविण्यात येत आहे. आमिर खानचा पीके हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट आहे व तो रेकॉर्ड दंगलने मोडावा असेही या ट्विटमधून राम गोपाल वर्मा यांनी सुचविले आहे.
}}}} ">http://
}}}} ">Aamir khan's films force the world to take india seriously and the other Khan's films make india look like a Choothiya regressive country}}}} ">— Ram Gopal Varma (@RGVzoomin) December 27, 2016