बेफिक्रे
गेल्या शुक्रवारी रिलीज झालेला ‘बेफिक्रे’ हा सिनेमादेखील अशाच धाटणीचा आहे. सिनेमात रणवीर आणि वाणी सुरुवातीपासून विचार करीत असतात की, आपण एकमेकांच्या प्रेमात पडायला नको. मात्र जेव्हा त्यांना समजते की, दोघेही या नात्यात खूप पुढे गेले आहेत तेव्हा ते एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. मैत्रीचे नाते निर्माण करण्याचाही ते प्रयत्न करतात.
बार - बार देखो
या सिनेमात कमिटमेंटपेक्षा कन्फ्यूजनच अधिक दाखविण्यात आले. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रामध्ये लग्नावरून खूपच कन्फ्यूजन असते. तो लग्न करायला घाबरतो. कदाचित हीच बाब प्रेक्षकांच्या पचनी पडली नसावी. मात्र सिनेमामध्ये सिद्धार्थ आणि कॅटरिनाच्या जोडीचे भरपूर कौतुक केले गेले. कॅटरिनाचा हॉट अंदाज प्रेक्षकांना भावला. तसेच काला चष्मा हे गाणेही २०१६ मधील जबरदस्त हिट ठरले.
लव आज कल
या सिनेमात सैफ अली खान आणि दीपिका पादुकोन एकमेकांना जीवापाठ प्रेम करीत असल्याचे दाखविण्यात आले. परंतु ही गोष्ट सांगण्यास दोघेही शेवटपर्यंत घाबरत असतात. दीपिकाची सैफसोबतची केमिस्ट्री चांगली जमली होती. युथमध्ये हा चित्रपट चर्चिला गेला.
एक मै और एक तू
या सिनेमात इमरान खान आणि करिना कपूर यांचीदेखील अशीच कथा दाखविण्यात आली आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात असतात, परंतु त्यांच्यातील कन्फ्यूजन मात्र कायम असते. मैत्री की प्रेम हा सिनेमाच्या अखेरपर्यंतचा मुद्दा असतो. विशेष म्हणजे सिनेमाचा शेवट कन्फ्यूजननेच दाखविण्यात आला आहे.
तमाशा
कमिटमेंटची प्रचंड भीती दाखविण्यात आलेल्या या सिनेमाची कथाही प्रेमामधील अडथळ्यांवर आधारित असल्याचे दाखविण्यात आले. रणबीर कपूर प्रेम आणि स्वत:वरून कन्फ्यूज असतो. कदाचित हल्लीच्या यूथमधील हे वास्तव असल्याचे सिनेमातून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. सरासरी कमाई केलेल्या या सिनेमातील रणबीर आणि दीपिकाची जोडी युथ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
सलाम नमस्ते
सैफ अली खान आणि प्रीती जिंटा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सलाम नमस्ते’ या सिनेमाची कथाही याच थीमवर आधारित आहे. भलेही गर्लफ्रेंड प्रेग्नेंट असली तरी कमिटमेंटविषयी अखेरपर्यंत कन्फ्यूजन असल्याचे सिनेमात दाखविण्यात आले आहे.