‘‘लोकांना मागील काही दिवसांपासून छोट्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे आम्ही आमच्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आहे, आता आमचा चित्रपट 13 जानेवारीला पंजाबी सन लोहरी दरम्यान प्रदर्शित केला जाईल’’, असे प्रियांका चोप्राची आई डॉ. मधू चोप्रा यांनी सांगितले. नोटबंदीमुळे आम्हाला हा निर्णय घेत असल्याचेही मधू चोप्रा यांनी मान्य केले. अभिनेत्री ते निर्माती असा प्रवास करणाºया प्रियाकां चोप्रा हिने पर्पल प्लेबल या बॅनरखाली मराठी, भोजपूरी व पंजाबी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
सावन हा पंजाबी भाषेतील चित्रपट असून यात परदेशात राहणाºया एका एनआरआयचा परतीच्या प्रवासाची भावानात्मक क था दाखविण्यात आली आहे. निर्मात्यांना हा चित्रपट पंजाबी चित्रपटगृहात वर्ष अखेरपर्यंत चालेल अशी अपेक्षा होती. मात्र अचानक आलेल्या नोटबंदीमुळे लोकांचे आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. विशेषत: चैनीच्या वस्तू व मनोरंजनाशी संबंधित असलेल्या वस्तूंवर त्याचा अधिक परिणाम दिसून येत आहे.
दिवाळीला प्रियांकाच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेला व्हेंटिलेटर हा मराठी चित्रपट रिलीज करण्यात आला होता, मात्र यानंतर आलेल्या नोटबंदीमुळे चित्रपटाचा पुढचा प्रवास खडतर होत गेला. व्हेंटीलेटरने सुमारे 11 कोटींचा गल्ला बॉक्स आॅफिसवर जमविला असल्याचे सांगण्यात येते. यावरून आणखी रिस्क न घेता हा चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा विचार निर्माती प्रियांका चोप्राने केला असावा.