होय, एकेकाळी सिक्स पॅक अॅब्सचा बादशाह असलेला हरमन आज पुरता बदलला आहे. ना ते कसलेले शरीर, ना सिक्स अॅब्स. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही बातमीसोबत दिलेले हे फोटो पाहायलाच हवेत. पांढरे केस, वाढलेले वजन अशा रूपात हरमनला पाहणे तुमच्यासाठी आश्चर्याचा धक्का असेल. हरमन आता चित्रपट करत नाही. त्यामुळेच कदाचित शरिरावर मेहनत घेण्याचे कुठलेच औचित्य हरमनकडे उरलेले नसावे.
हरमन व प्रियांका चोप्रा यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या एकेकाळी प्रचंड गाजल्या होत्या. दोघेही पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. ‘लव्ह स्टोरी२०५०’च्या सेटवरच दोघांमध्ये प्रेम फुलले होते. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले. यानंतर हरमन व बिपाशा यांच्या डेटींगच्या बातम्याही आल्यात.२०१४ मध्ये आपण बिपाशासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे हरमनने म्हटले होते. मात्र त्यावर्षी डिसेंबरमध्ये बिपाशाने हरमनसोबत ब्रेकअप झाल्याचे जाहिर केले. ‘विक्ट्री’,‘व्हाट्स योर राशी’,‘ढिश्कियाऊं’ असे चित्रपट हरमनच्या नावावर आहेत. पण हे सगळेच चित्रपट बॉक्सआॅफिसवर आपटलेत अन् हरमनच्या करिअरला उतरती कळा लागली.