1 / 8संजय लीला भन्साळींचा 'बाजीराव मस्तानी' सुपरहिट ठरला होता. रणवीर सिंह बाजीराव तर दीपिका पदुकोण मस्तानीच्या भूमिकेत. पण प्रियंका चोप्रापुढे (Priyanka Chopra) हे दोघंही फिके पडले होते. प्रियंकाने काशीच्या भूमिकेत सर्वांचंच मन जिंकलं होतं.2 / 8काशी म्हणजेच बाजीराव पेशव्यांच्या पहिल्या पत्नीची भूमिका तिने साकारली होती. तिचे डायलॉग्स तर प्रचंड गाजले. 'आप हमसे हमारी जिंदगी माँग लेते हम खूशी खूशी दे देते मगर आपने हमसे हमारा गुरुर ही छीन लिया' या डायलॉगने थिएटरमध्ये टाळ्या वाजल्या.3 / 8भन्साळींच्या सिनेमात काम करणं खूप कठीण असतं असं नेहमीच अनेक अभिनेत्री सांगतात. पाहिजे तसा शॉट मिळाला नाही तर ते मोठ्या मोठ्या स्टार्सवरही भडकतात. प्रियंकाने तर करिअरमध्ये इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच भन्साळींसोबत काम केलं. 4 / 8खूप कमी जणांना माहित असेल पण प्रियंका चोप्रा बाजीराव मस्तानी सिनेमा शूटिंगच्या तिसऱ्याच दिवशी सोडणार होती. भन्साळींच्या शिस्तीला पाहून ती इतकी वैतागली की सेटवरच रडलीही होती.5 / 8प्रियंकाला भन्साळींसोबत अॅडजस्ट करणं खूप कठीण गेलं होतं. तिसऱ्या दिवशी तिला रडूचं कोसळलं. मी सेट सोडून घरी जात आहे असंही तिने सांगितलं होतं. 6 / 8नंतर तिला समजावलं गेलं आणि तिने शूट पूर्ण केलं. यामुळेच काशी ची भूमिका तिने इतक्या दमदार पद्धतीने साकारली. 7 / 8प्रियंकाने भन्साळींच्या 'रामलीला' सिनेमातही कॅमिओ केला होता. राम चाहे लीला चाहे लीला चाहे राम' या टायटल साँगमध्ये ती दिसली. 8 / 8मात्र अद्याप प्रियंका संजय लीला भन्साळींच्या सिनेमात लीड रोल मध्ये दिसलेली नाही. बाजीराव मस्तानी मध्ये तिचा अभिनय पाहिल्यानंतर तिला भन्साळींच्या सिनेमात मुख्य भूमिकेत पाहण्याची अनेक चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली.