1 / 8फिल्म इंडस्ट्रीतील ब्युटी क्वीन अशी ओळख असलेली ही अभिनेत्री. तिच्या गोड आणि सुंदर चेहऱ्यावर चाहते फिदा आहेत. शिवाय तिचा कमालीचा फिटनेसही वाखणण्याजोगा आहे.2 / 8ही अभिनेत्री म्हणजे प्राची देसाई (Prachi Desai). सौंदर्य आणि अभिनय या दोन्ही गोष्टी असूनही प्राचीला केवळ आऊटसाइडर असल्याने काम मिळालं नाही.3 / 8सध्या प्राची 'सायलेन्स 2' सिनेमामुळे चर्चेत आहे. यामध्ये तिने मनोज वाजपेयींसोबत स्क्रीन शेअर केली. प्राचीने अनेकदा इंडस्ट्रीतील काळं सत्य उघडपणे बोलून दाखवलं आहे. कास्टिंग काऊच, नेपोटिझममुळे तिला काम मिळालेलं नाही.4 / 8प्राचीचं सौंदर्यच तिची अडचण ठरेल असं तर तिला स्वप्नातही वाटलं नसेल. पण होय, खूपच सुंदर दिसते म्हणून तिला अनेक प्रोजेक्ट्ससाठी नाकारलं आहे. एखाद्या भूमिकेसाठी आपण खूपच सुंदर आहोत म्हणून नाकारलं जाऊ शकतं याचा प्राचीला धक्का बसला होता.5 / 8प्राची म्हणाली होती की,'एक कलाकार म्हणून बरंच काही करण्याची, वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची इच्छा असते. पण शेवटी दिग्दर्शक आणि लेखकाचाच तो अंतिम निर्णय असतो. 6 / 8तसंच नेपोटिझममुळे तिच्या हातातून अनेक प्रोजेक्ट्स गेले. स्टारकीड्सना सतत काम मिळत राहतं, त्यांचे चित्रपट फ्लॉप झाले तरी त्यांना सिनेमे ऑफर होतात. हेच आऊटसाइडरचं झालं तर आम्हाला काम मिळणं कठीण होतं, असं म्हणत प्राचीने स्टारकीड्सवर निशाणा साधला होता.7 / 8प्राचीने 'कसम से' मालिकेतीन टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र नंतर ती सिनेमांकडे वळली. रॉक ऑननंतर तिने 'वन्स अपॉन टाईम इन मुंबई','बोलबच्चन' हे सिनेमे केले.8 / 8ओटीटीमुळे प्राचीचं करिअर आता रुळावर आलं आहे. ती नुकतीच 'धूथा' या तेलुगु सीरिजमध्येही दिसली. यामध्ये तिने नागाचैतन्यसोबत स्क्रीन शेअर केली.