Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात येऊ शकतात ‘या’ 10 लोकप्रिय वेबसीरिजचे सीक्वल, पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 17:04 IST

1 / 10
पाताललोक ही सीरिज 15 मे 2020 रोजी रिलीज झाली होती. ही सीरिज धम्माल गाजली. 2022 मध्ये या सीरिजचा सीक्वल येईल, अशी अपेक्षा आहे.
2 / 10
द फॅमिली मॅन ही सीरिज लोकांनी डोक्यावर घेतली. 4 जून 2021 रोजी या सीरिजचा दुसरा पार्टही रिलीज झाला. दुसºया सीझनमध्येच तिसरा पार्ट येणार, याचे संकेत मेकर्सनी दिले होते. कदाचित 2022 मध्ये या सीरिजचा तिसरा पार्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो.
3 / 10
शेफाली शाहची मुख्य भूमिका असलेली ‘दिल्ली क्राईम’ ही सीरिज 2019 मध्ये रिलीज झाली होती. या सीरिजच्या दुसºया पार्टची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अशात नव्या वर्षात या सीरिजचा दुसरा भाग येईल, याची शक्यता वाढली आहे.
4 / 10
‘अनदेखी’ ही एक मर्डर मिस्ट्री थ्रीलर सीरिज. बंगाल व हिमाचलमध्ये झालेल्या मृत्यूतील कनेक्शन दाखवणाºया या सीरिजच्या सीक्वलचीही प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
5 / 10
अर्शद वारसी स्टारर ‘असूर 2’ या सीरिजचीही प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. शूटींग जोरात सुरू आहे. नव्या वर्षात ही सीरिज रिलीज होऊ शकते. सीरिजचा पहिला सीझन चांगलाच गाजला होता.
6 / 10
जीतेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुवीर यादव स्टारर ‘पंचायत’ ही सीरिज लोकांना प्रचंड आवडली. येत्या वर्षात याचा सीक्वल येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
7 / 10
‘मिर्झापूर’च्या तिस-या सीझनकडेही चाहते नजरा लावून बसले आहेत. पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी, अली फजल, विक्रांत मेस्सी यांच्या अभिनयाने सजलेल्या या सीरिजचा तिसरा पार्टही लोक पाहू इच्छितात.
8 / 10
जेनिफर विंगेट स्टारर ‘कोड एम’च्या पहिल्या सीझनची पहिली केस संपली. आता या सीरिजच्या दुसºया सीझनची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.
9 / 10
जोया अख्तर व रीमा कागती यांच्या ‘मेड इन हेवन’ या सीरिजला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. याच्या सीक्वलची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.
10 / 10
मुंबई डायरीज ही पण एक गाजलेली सीरिज. मुंबई हल्ल्याच्या दिवशी रूग्णालयात काय स्थिती होती. याची डॉक्टरांची ही कथा. याचवर्षी सप्टेंबरमध्ये ही सीरिज रिलीज झाली होती. नव्या वर्षात या सीरिजचा सीक्वल आपल्याला बघायला मिळणार आहे.
टॅग्स :वेबसीरिज