प्रियंकाने हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "One of those.. what was I thinking mornings.. I don't think I ever do.. and that's ok.. follow you heart. It'll never do u wrong.. #throwbackthursday #beachlife" प्रियंकाने हा फोटो शेअर करताच सुमारे तीन लाख ७० हजारांपेक्षा अधिक यूजर्सनी त्यास लाइक्स केले आहे. तर दीड हजारांपेक्षा अधिक कमेंट्स दिल्या आहेत. मात्र प्रियंकाने पहिल्यांदाच बिकिनी पोज दिली असे नसून, यापूर्वीदेखील तिला अनेकदा बिकिनी पोजमध्ये बघितले आहे. जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन स्टारर ‘दोस्ताना’मध्ये तर तिचा गोल्डन स्विमसूट खूपच चर्चेत राहिला होता.
त्यानंतर एका अल्बममध्ये ती बिकिनी अवतारात बघावयास मिळाली होती, तिचा हा लुक जबरदस्त हॉट अॅण्ड सेक्सी असा होता. ‘क्वांटिको’च्या सेटवरदेखील ती स्विमसूट आणि बिकिनी पोजमध्ये बघावयास मिळाली होती. त्यावेळी तिचे हे फोटो वाºयासारखे व्हायरलही झाले होते. आता पुन्हा प्रियंका अशाच बिकिनी अवतारात दिसत असल्याने तिच्या फॅन्सला तिचा हा सुपरहॉट अंदाज खूपच भावत असल्याचे दिसत आहे.
‘क्वांटिको’ या शोबरोबरच प्रियंकाचा हॉलिवूड डेब्यू असलेला ‘बेवॉच’ हा सिनेमा लवकरच रिलिज होणार आहे. या सिनेमामुळे सध्या ती चर्चेत असून, प्रमोशननिमित्तही ती जागोजागी फिरत आहे. नुकत्याच झालेल्या ‘आॅस्कर’ अवॉर्डमध्येही प्रियंकाने हजेरी लावली होती. यावेळी प्रियंकाचा सुपरहॉट अंदाज चांगलाच चर्चेत राहिला होता.