१९७५ मध्ये रिलीज करण्यात आलेला हा सिनेमा बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी आयकॉनिक समजला जातो. त्याकाळी दोस्तीची मिसाल देणाºया ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ या गाण्याने धूम उडवून दिली होती. हे गाणे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्यात एक ट्रॉली असलेली बाइक दाखविण्यात आली होती. गाण्याच्या मध्यंतरात विरू म्हणजेच धर्मेंद्र बाइकच्या ट्रॉलीमधून उतरून जय अमिताभ बच्चन यांच्या खांद्यावर बसतो. त्यावेळी ट्रॉली रिकामी असते. या रिकाम्या ट्रॉलीमध्ये अनुष्काने तिचा फोटो पोस्ट केला आहे.
फोटो शेअर करताना अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आता तुम्हाला समजले असेल की, वीरू जयच्या खांद्यावर का बसला आहे. कारण शशी ट्रॉलीमध्ये बसलेली होती’ अनुष्काच्या या फोटोने सध्या धूम उडवून दिली असून, नेटिझन्सकडून त्यास जबरदस्त पसंत केले जात आहे. दरम्यान, या सिनेमामध्ये अनुष्का भुताच्या भूमिकेत असून, मांगलिक मुलगा ‘सूरज शर्मा’ याच्याबरोबर तिचे लग्न होते. सिनेमाच्या फ्लॅशबॅकमध्ये अनुष्का आणि दिलजीत दोसांझ यांची लव्हस्टोरी दाखविण्यात आली आहे. या सिनेमाची निर्मिती खुद्द अनुष्का शर्मा करीत आहे.