Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कालीन भैय्या'च्या लेकीसमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या, सौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 12:55 IST

1 / 8
राष्ट्रीय पुरस्कार विजेता पंकज त्रिपाठीला कोणत्याच परिचयाची गरज नाही. त्यांचा सहज पण कसदार अभिनय प्रेक्षकांना प्रभावित करतात.
2 / 8
कमी डायलॉग्स असले तरी फक्त हावभावातून ते समोरच्यापर्यंत थेट पोहोचतात. मग ते 'मिर्झापूर' मधील कालीन भैय्या असोत किंवा 'बरेली की बर्फी' मधील क्रिती सेननचे वडील. प्रत्येक भूमिकेत ते जीव ओतून काम करतात. नुकताच त्यांना मिमी सिनेमातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
3 / 8
पंकज त्रिपाठी यांच्या फिल्मी करिअरविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहेत.
4 / 8
पंकज त्रिपाठी यांच्या लेकीची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. पंकज त्रिपाठी यांची 17 वर्षांची मुलगी आशी त्रिपाठी दिसायला एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे.
5 / 8
काही दिवसांपूर्वी डॉटर्सच्या निमित्ताने अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलीसोबतचे फोटो शेअर केले होते. नेटकरीने तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं होतं.
6 / 8
आशी सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही. परंतु, पंकज यांची पत्नी मृदुला कायम त्यांच्या लेकीचे फोटो शेअर करत असते.
7 / 8
आशी दिसायला प्रचंड सुंदर असून अनेक जण ती बॉलिवूडमध्ये पदार्पण कधी करणार असा प्रश्न विचारला जातो.
8 / 8
IIFA 2022 मध्ये पहिल्यांदाच पंकज त्रिपाठी यांची लेक कॅमेरासमोर आली आणि तेव्हापासून ती चर्चेत आली आहे.
टॅग्स :पंकज त्रिपाठी