अमिताभ बच्चन
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील विदेशातील एका एनजीओसोबत अवयवदानाबाबत करार केला आहे. मृत्यूनंतर त्यांनी त्यांचे डोळे दान केले आहेत. अमिताभच्या या निर्णयामुळे त्यांचे हॉलिवूडबरोबरच बॉलिवूडमध्येदेखील कौतुक केले गेले. शिवाय, अनेकांनी अमिताभकडून याबाबतची प्रेरणा घेत अवयवदानाचा निर्णय घेतला.
आमिर खान
सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असणाºया मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान यानेदेखील अवयवदान केले आहेत. मृत्यूनंतर आमिरने शरीरातील किडनी, डोळे, हृदय, यकृत आदी अवयव दान केले आहेत. ‘शिप आॅफ थीसियस’ हा चित्रपट बघितल्यानंतर त्याला अवयव दान केल्याची जाणीव झाल्याचे तो म्हणतो. आमिरचा हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
सलमान खान
नेहमीच वादात गुरफट असलेल्या सल्लुमियाँचे सामाजिक कार्यदेखील वाखणण्याजोगे आहे. त्यामुळेच त्याला ‘बडे दिलवाला’ असे म्हटले जाते. बीइंग ह्युमन या संस्थेच्या माध्यमातून त्याने अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्याचबरोबर त्याने शरीरातील ‘बोन मॅरो’देखील दान केले आहे. बोन मॅरो शरीरातील लाल रक्त कणिका बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्याने त्याच्या फॅन्सनादेखील अवयव दान करण्याचे आवाहन केले आहे.
प्रियंका चोपडा
बॉलिवूडची ‘जंगली बिल्ली’ म्हणून ओळख असलेल्या प्रियंका चोपडा हिला अवयवदानाचे महत्त्व काय असते हे अगदी जवळून अनुभवता आले आहे. कारण, तिच्या वडिलाचा मृत्यू याच कारणाने झाला आहे. त्यामुळे तिने गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या आर्मी फंक्शनमध्ये मृत्यूनंतर अंगदान करण्याची शपथ घेतली होती. तिच्या या निर्णयानंतर सर्व स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.
आर. माधवन
बॉलिवूडसह साऊथ इंडियन चित्रपटांमध्ये प्रसिद्ध असलेल्या अभिनेता आर. माधवन यानेदेखील शरीरातील महत्त्वपूर्ण अंग दान करण्याचा निर्णय घेतला आहे. डोळे, यकृत, हृदय, लंग्स आदी अवयव दान करणार आहे. चॉकलेट इमेज असलेल्या माधवनचा हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
राणी मुखर्जी
दिग्दर्शक आदित्य चोपडा यांच्याशी विवाहबंधनात अडकलेल्या अभिनेत्री राणी मुखर्जी हिनेदेखील मृत्यूनंतर डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या मते, मृत्यूनंतर माझे डोळे कोणाचे तरी आयुष्य प्रकाशमान करू शकेल. असा मृत्यू माझ्यासाठी आनंददायी असेल. प्रत्येकांनीच अवयवदान करायला हवे.
फराह खान
फराह खानला बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी आणि पॉवरफुल लेडी म्हणून ओळखले जाते. फराहने हा निर्णय घेतला आहे की, ती डोळे तर दान करणारच शिवाय त्यावेळेस जर कोणाला शरीरातील अन्य अंगाची गरज भासली, तर तो अवयवदेखील ती दान करेल. फराहचा हा निर्णय इतरांसाठी प्रेरणादायी असा ठरत आहे.
ऐश्वर्या राय-बच्चन
जगातील सुंदर महिलांपैकी एक असलेल्या ऐश्वर्या राय-बच्चन हिने तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. एका आयबँक असोसिएशनसोबत तिने याबाबतचा करार केला आहे. मध्यंतरीच्या काळात ऐश्वर्याने अवयवदान करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सरकारच्या मदतीने मोहीम चालविली होती.