गुरुमित चौधरी आणि सना खान
नुकताच रिलिज झालेल्या ‘वजह तुम हो’ या चित्रपटातील गुरुमित चौधरी आणि सना खान यांनी, तर इंटिमेंट सीन्सची व्याख्याच बदलून टाकली. चित्रपटात दोघांची जबरदस्त केमिस्ट्री बघावयास मिळत असून, दोघांमधील बोल्ड सीन्स रिलिज अगोदरच सुपरहिट ठरले. यू-ट्यूबवर चित्रपटाचे ट्रेलरने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता प्रेक्षक त्यास कितपत पसंती देतात, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.
रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रॉय
गेल्या महिन्यात रिलीज झालेल्या ‘ए दिल है मुश्किल’ हा चित्रपट कदाचित रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रॉय यांच्यातील हॉट सीन्समुळे दीर्घकाळ स्मरणात राहील. पाकिस्तानी कलाकार फवाद खान याच्यामुळे जेवढा हा चित्रपट वादग्रस्त ठरला तेवढाच रणबीर-ऐशच्या रोमान्समुळेही चर्चेत आला. ऐश्वर्यापेक्षा लहान असलेल्या रणबीरची तिच्यासोबतची केमिस्ट्री बघण्यासारखी होती.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ
रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले असताना ‘बार बार देखो’ या चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांच्यातील आॅनस्क्रीन केमिस्ट्री एका वेगळ्याच चर्चेला वळण देऊन गेली. अर्थात नंतरच्या काळात त्यावर पडदा पडला. चित्रपटातील सिद्धार्थ आणि कॅटची जोडी जबरदस्त हॉट होती. कॅटच्या समुद्रातील बिकनी सीन्सने तर खळबळ उडवून दिली होती. समुद्रातील दोघांचा रोमान्स चर्चेचा विषय ठरला होता.
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोन
‘बाजीराव मस्तानी’ हा सुपरहिट चित्रपट जेवढा एतिहासिक मुद्द्यांवरून गाजला तेवढाच दीपिका आणि रणवीरमधील हॉट सीन्समुळेही गाजला. बाजीराव पेशवा यांची प्रेमकहाणी असलेल्या या चित्रपटात दीपिकाचा मस्तानीच्या भूमिकेतील लुक जबरदस्त होता. चित्रपटात दोघांनी दिलेले सीन्स कथेला हॉटनेसचा तडका लावणारे ठरले. रणवीर आणि दीपिकामधील केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली.
अर्जुन कपूर आणि परिणिती चोपडा
अर्जुन कपूर आणि परिणिती चोपडा यांनी ‘इश्कजादे’ या चित्रपटात दिलेल्या इंटिमेंट सीन्सने अक्षरश: खळबळ उडवून दिली होती. चित्रपटातील ट्रेनमध्ये दोघांचा लिपलॉक सीन्स प्रचंड गाजला होता. प्रेक्षकांनादेखील हा चित्रपट भावला होता. दोघांनी चित्रपटात अगदी ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे’ असेच दाखवून दिले.
आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर
‘आशिकी-२’ मधील आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा परफॉर्मन्स आजही आठवतो. चित्रपटात दोघांची जबरदस्त केमिस्ट्री जमली होती. चित्रपटाचे जेवढे गाणे चर्चेत राहिले तेवढेच या दोघांमधील अफेयरही चर्चिले गेले. आजही दोघांमध्ये काही तरी शिजत असल्याचे बोलले जाते.
वरुण धवन आणि आलिया भट्ट
‘स्टूंडट आॅफ द इयर’ या चित्रपटातून एकत्र आलेल्या आलिया भट्ट आणि वरुण धवन ही जोडी प्रेक्षकांना आजही भावते. आतापर्यंत एकत्र काम केलेल्या सर्वच चित्रपटांमध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री जुळली आहे. ही जोडी आॅनस्क्रिन जेवढी चर्चेत असते, तेवढीच आॅफस्क्रिन असते. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटात दोघांचा रोमान्स बघण्यासारखा होता.