ट्रेलर लॉन्चदरम्यान निधीचे नाव पुकारले गेले. तशी निधी स्टेजवर जायला निघाली. स्टेजवर चढत असताना तिला आपला ड्रेस वर उचलावा लागला आणि याच क्षणाला तिला एका अवघडलेल्या स्थितीचा सामना करावा लागला.
ALSO READ : पाहा, टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकल’चा ट्रेलर!
या इव्हेंटमध्ये निधीने डिझाईनर फराह संजनाने डिझाईन केलेला मॅक्सी ड्रेस कॅरी केला होता. सोबत सुहानी पिटीचे ईअर रिंग्स घातले होते. या लूकमध्ये निधी अतिशय सुंदर दिसत होती. पण नेमक्या याचवेळी निधीच्या ड्रेसने तिला दगा दिला. मध्यंतरी निधीला तिच्या सोसायटीतून बळजबरीने घराबाहेर काढण्यात आल्याची बातमी आली होती. निधी सिंगल आहे, शिवाय अॅक्ट्रेस आहे, यामुळे तिला बळजबरीने बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता.
दिग्दर्शक साबीर खान दिग्दर्शित ‘मुन्ना मायकल’ येत्या जुलैमध्ये रिलीज होणार आहे. टायगर श्रॉफशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीची यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘मुन्ना मायकल’मध्ये टायगर स्ट्रिट डान्सर बनला आहे. लहानपणी रस्त्यांवर नाचून पैसे गोळा करणाºया टायगरला एकदिवस नॅशनल डान्स कॉम्पिटीशनमध्ये भाग घेण्याची संधी मिळते आणि त्याचे नशीब एकदम कलाटणी घेते, अशी ही कथा आहे. ‘मुन्ना मायकल’ हा साबीर खानसोबतचा टायगरला तिसरा चित्रपट आहे. याआधी साबीरच्या ‘हिरोपंती’ आणि ‘बागी’मध्ये टायगर दिसला आहे.