एमी जॅक्सन
बॉलिवूड सौंदर्यवतींमध्ये हमखास नाव घेतले जात असलेल्या एमी जॅक्सन हिने मध्यंतरीच्या काळात बॅकलेस फोटोशूट करून धूम उडवून दिली होती. एमीने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तिच्या चाहत्यांनी हे फोटो असे काही व्हायरल केले होते की, ती त्यावेळेस चर्चेतील चेहरा ठरली होती. फोटोतील एमीचा अंदाज आग लावणारा होता. एमीचे हे फोटो तिच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरले.
प्रियंका चोपडा
प्रियंका चोपडाने अशाच प्रकारचे बॅकलेस फोटोशूट केले होते. बॉलिवूडमध्ये टॉपच्या अॅक्ट्रेसमध्ये स्थान असलेल्या या फोटोंमध्ये प्रियंका नेहमीप्रमाणेच जबरदस्त हॉट दिसत होती. फोटोमध्ये प्रियंका ज्यापद्धतीने एक्स्पोज झाली त्यावरून तिचे चाहते नक्कीच तिच्या प्रेमात पडले असतील.
मलाइका अरोरा
मलाइका सिनेमांमध्ये फारशी झळकत नसली तरी, तिच्या स्टाइलमुळे ती नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. चाळीशी पार केलेल्या मलाइकाचा फिगर आजही तिच्या चाहत्यांना आकर्षक आहे. त्यामुळे ती बिकनीत असो वा बॅकलेस तिचे फोटो नेहमीच बोल्ड असे वाटतात.
श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूर या क्यूट अॅक्ट्रेसनेदेखील बॅकलेस फोटोशूट करून धूम उडवून दिली होती. डब्बू रत्लानीच्या कॅलेंडरसाठी तिने अशाप्रकारचे फोटोशूट केले होते. श्रद्धाचा अशाप्रकारचा हॉट अॅण्ड बोल्ड अवतार क्वचितच बघावयास मिळतो.
दीपिका पादुकोण
बॉलिवूडची डिंपल गर्ल दीपिका पादुकोण ही एकदा नव्हे तर अनेकदा बॅकलेस पोजमध्ये बघावयास मिळाली. दीपिकाचा अंदाज तिच्या इतर अंदाजाच्या तुलनेत खूपच बोल्ड, सेक्सी आणि आकर्षक वाटतो. आपल्या स्माइलने घायाळ करणाºया दीपिकाच्या या अंदाजावर तिचे चाहते लट्टू झाले नसतील तरच नवल.
कॅटरिना कैफ
‘बार बार देखो’ या सिनेमात कॅटरिना बिकिनी अवतारात दिसल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. मात्र यापेक्षा कॅटरिनाचे बॅकलेस फोटोशूट अधिक चर्चेत राहिले आहेत. बिकिनीपेक्षा तिचा हा अवतार अधिक पसंत केला होता.
ऐश्वर्या राय-बच्चन
माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय-बच्चन हिचा जलवा आजही प्रेक्षकांना घायाळ करणारा आहे. मोठ्या ब्रेकनंतर तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले असून, ‘ऐ दिल है मुश्किल’मधील रणवीर कपूरबरोरची तिची केमिस्ट्री खूपच चर्चेत राहिली. ऐशनेदेखील बॅकलेस फोटोशूट करून धूम उडवून दिली आहे.
करिना कपूर
बॉलिवूडची बेबो करिना तिच्या फिगरसाठी ओळखली जाते. अशात करिनाचा बॅकलेस अवतार चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार नाही तरच नवल. करिनाने अशाप्रकारचे फोटोशूट करून आग लावली होती.