ALSO READ : कान्समधील ऐश्वर्या, दीपिका व सोनमचे काही candid फोटो!!
कान्समध्ये सोनमने नेसलेली व्हाईट साडी आठवते? ती आनंद अहुजाची चॉईस होती. यासाठी आनंदनेच सोनम व तिची बहीण रियाला डिझाईनर्स सुचवले होते. आनंदचा स्वत:चा गारमेंट्स बिझनेस आहे. त्यामुळे या डिझाईनर्सला तो चांगल्याप्रकारे ओळखत होता. मग काय, आनंदने त्या डिझाईनर्सची शिफारस केली. सोनम याचमुळे कान्समध्ये सिम्मा साडीत दिसली. भारतीय डिझाईनर्सला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश होता. आता या साडीत सोनम किती सेक्सी अन् ग्लॅमरस दिसली, हे तुम्ही पाहिलेच. एकंदर काय, तर सोनमसारखीच आनंदची फॅशन टेस्टही जबरदस्त म्हणायला हवी.
गेल्या काही दिवसांपासून सोनम व आनंदची जवळीक वाढली आहे. दोघांनीही अनेकदा त्यांच्या रिलेशनशिपबद्दल हिंट दिलीय. यावर्षीचे नववर्षांचे सेलिब्रेशन दोघांनी एकत्र केले होते. सोनमच्या अनेक फॅमिली फंक्शनमध्येही आनंद अलीकडे दिसायला लागला आहे. नुकताच सोनमला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला आनंद हजर होता. यावरून दोघांच्या नात्याची कल्पना यावी.